Share

“..खाऊ भाईजानला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे”, रुपाली पाटील आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: युट्युबर विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊने सोशल मिडीयावर दहावी-बारावी विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत अफवा पसरवली होती. त्याच्या अफवेमुळे काल (३१ जानेवारी)हजारो विद्यार्थ्यांनी(student aggression After the rumor of Hindustani Bhau) मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केली. विद्यार्थ्यांच्या या गोंधळामुळे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान हिंदुस्थानी भाऊ ऊर्फ विकास पाठकविरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक (Hindustani bhau arrested for spreading rumors) करण्यात आली आहे. तसेच आज त्याला बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. आता यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटीलदेखील(NCP Leader Rupali Patil) आक्रमक झाल्या आहेत.

“प्रसिद्धीसाठी विद्यार्थ्यांना भडकवून त्यांच्या जीवाशी खेळणारा “भडखाऊ भाईजान” ला कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढला पाहिजे, त्याच्यावर तात्काळ कारवाई करून त्याची मस्ती जिरवावी”, अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्याकडे रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट करत केली आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत असे म्हटले आहे, मात्र सोशल मीडियावर दहावी आणि बारावीची परीक्षा राज्य सरकार ऑनलाईन घेणार आहे अशी अफवा ‘हिंदुस्थानी भाऊ’ ऊर्फ विकास पाठक तरुणाने पसरली होती. याचा परिणाम म्हणजे काल राज्यभर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. हिंदुस्थानी भाऊने आम्हाला बोलावले असून त्यांनीच आंदोलनासाठी निर्धार केल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले. त्यामुळे या गोंधळाचा मुख्य सूत्रधार हिंदुस्थानी भाऊला अटक करण्यात आली आहे. आज त्याला बांद्रा कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!