Share

‘…योद्धा ये महान हैं’, शरद पवार कोरोनामुक्त होताच राष्ट्रवादीने दिल्या अनोख्या शुभेच्छा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Nationalist Congress Party President Sharad Pawar Coronation Free) कोरोनामुक्त होताच राष्ट्रवादी पक्षाने त्यांना ‘समय बलवान हैं, योद्धा ये महान हैं’ अशा गाण्याचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फेसबुक पेजवर पोस्ट करत अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान शरद पवारांनी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फेसबुक पेजवर एक खास व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. (Unique Wishes to Sharad Pawar Through Video) ज्यात शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ते आतापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. (Sharad Pawar Political Career) विविध राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवरील नेते, दिग्गज व्यक्तींसोबत असलेले पवारांचे फोटो आणि व्हिडीओ यात वापरण्यात आले आहेत. यामध्ये दिवंगत अभिनेते दिलीप कुमार, माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, भाजपचे ज्येषठ नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर शरद पवार यांचा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ, केंद्रात संरक्षणमंत्री, कृषी मंत्रीपदाची सांभाळलेली जबाबदारी, बीसीआयचे अध्यक्षपद अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळतानाचे क्षण यात दाखवण्यात आले आहेत.

या व्हिडिओतील गीतही भावणारे असून ‘समय बलवान हैं, योद्धा ये महान हैं… हर अर्जुन का सारथी, ये इसकी पहचान हैं’ असे याचे बोल आहेत. दरम्यान “आज माझी पुन्हा एकदा कोरोना चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. माझी तब्येत देखील चांगली आहे. मला कोरोना झाल्यानंतर मी लवकर बरा व्हावा यासाठी अनेकांनी प्रार्थना केली, ते माझे सर्व सहकारी, मित्र, हितचिंतक आणि डॉक्टरांचे मी आभार मानतो”, असे ट्वीट शरद पवारांनी केले आहे. २४ जानेवारी रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

 

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!