🕒 1 min read
चंद्रपूर : नक्षलग्रस्त भागात पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी भारत बटालियन-4 ची स्थापना करण्याचा निर्णय झाला असून, यासाठी एक हजार सात पदांना मंजुरीही देण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ही बटालियन चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांसाठी कार्यरत असेल.
जेव्हा-केव्हा पोलिसांना तातडीच्या मदतीची गरज असेल, तेव्हा ही बटालियन तातडीने त्या ठिकाणी जाऊन पोलिसांना सहकार्य करेल आणि प्रत्यक्ष कृती करेल. यात उपरोक्त तीन जिल्ह्यातील युवकांचा समावेश केला जाणार आहे. या बटालियनच्या मुख्यालयासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील कोर्टी मक्ता येथे जागा मंजूर करण्यात आली असून, लवकरच पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहितीही सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
- Independence Day | “या इव्हेंटबाजीत तिरंग्याचा मान राखला जात नाही”; नाना पटोलेंची ‘हर घर तिरंगा’वर टीका
- Ajit Pawar। ‘कुवत नसलेली लोकं सत्तेत बसत असतील तर..’; अजित पवारांचं मोदींना प्रत्युत्तर
- Sonia Gandhi on Independence Day | “स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला तुच्छ लेखण्याचं काम सुरु”; सोनिया गांधींची भाजपवर जोरदार टीका
- Prakash Ambedkar। ‘हर घर तिरंगा’ हा राष्ट्रीय कार्यक्रम नसून…; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल
- Independence Day | परिवारवाद देशासाठी धोकादायक आहे, त्याचे शुद्धीकरण आवश्यक आहे – पंतप्रधान मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
