Share

Ajit Pawar। ‘कुवत नसलेली लोकं सत्तेत बसत असतील तर..’; अजित पवारांचं मोदींना प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

Ajit Pawar। मुंबई : भारत आज ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात घराणेशाहीवर निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले की, कुटुंबवाद देशासाठी अत्यंत घातक आहे. जेव्हा मी घराणेशाही आणि घराणेशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकांना वाटते की मी फक्त राजकारणावर बोलत आहे. नाही, दुर्दैवाने राजकीय क्षेत्रातील दुष्टाईने भारतातील प्रत्येक संस्थेत कुटुंब वाद पोसला आहे. कुटुंबवादामुळे हुशार मुले मागे राहतात, असे पंतप्रधान म्हणाले. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले, की ज्यांच्यामध्ये कुवत आहे अशा लोकांना सत्तेवर बसवत असाल तर याला घराणेशाही बोलणं चुकीचं आहे. कुवत नसलेली लोक सत्तेत बसत असतील, तर आपण त्याला घराणेशाही बोलू शकतो, असं ते म्हणाले. तसेच पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, की उद्धव ठाकरे यांच्या काळात जय महाराष्ट्र आधी बोलायचे. मात्र, आता ती प्रथा बदलली आहे. सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांनी सरकारी कार्यालयात वंदे मातरम् बोलण्याचा आदेश दिला आहे. हा त्यांचा अधिकार आहे, असंही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, राज्यात शासकीय कार्यालयात आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ने संभाषणाला सुरुवात करण्याबाबतची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. वंदे मातरम हे पद्य नाही, गीत नाही हे ऊर्जा वाढवणारे शब्द आहेत. 26 जानेवारीपर्यंत प्रत्येकाची मानसिक तयारी अशी व्हावी की, ‘वंदे मातरम’पासून दिवसाची किंवा संवादाची सुरूवात व्हावी. विधानसभेच्या अधिवेशनाची सुरूवातही वंदे मातरमने मी करतो. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येकाने या अभियानामध्ये सहभागी व्हावं, असं आवाहनही मुनगंटीवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!