🕒 1 min read
नवी दिल्ली : आज आपण भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. याच पार्श्वभूमीवर आज देशभरात विविध राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावर केलेल्या आजच्या भाषणातून गांधी घराण्यावर आणि काँग्रेसवर टीका केली. तर दुसरीकडे काँग्रेसतर्फे सोनिया गांधी यांनीही भारतीय नागरिकांना एक पत्र लिहून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भारतातील राजकीय आणि सामाजिक सद्यस्थितीवर त्यांच्या भावना व्यक्त करत भाजपवर अप्रत्यक्ष टीकाही केली आहे.
सोनिया गांधी यांनी लिहिले आहे कि, “गेल्या 75 वर्षांत भारताने कर्तृत्ववान भारतीयांच्या कठोर मेहनतीच्या जोरावर विज्ञान, शिक्षण, आरोग्य आणि माहिती तंत्रज्ञान यासह सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. आपल्या दूरदर्शी नेत्यांच्या नेतृत्वाखाली एकीकडे मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक व्यवस्था प्रस्थापित करताना दुसरीकडे लोकशाही आणि घटनात्मक संस्थाही मजबूत केल्या आहेत. यासोबतच भाषा-धर्म-समुदाय यांच्या कसोटीवर सदैव खंबीरपणे उभा राहिलेला आघाडीचा देश म्हणून भारताची अभिमानास्पद ओळख निर्माण झाली आहे. गेल्या 75 वर्षात आपण अनेक क्षेत्रात यश मिळवले आहे, पण आजचे आत्ममग्न असलेले सरकार आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या महान बलिदानाला आणि देशाच्या गौरवशाली कामगिरीला तुच्छ ठरवत आहे. जे आपण कधीच होऊ नाही दिले पाहिजे.”
https://twitter.com/ANI/status/1559037063315755008?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1559037063315755008%7Ctwgr%5E2f59cc47c97677939c6ac6bdef4c58916af7c7ba%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fdesh%2Fcongress-president-sonia-gandhi-greetings-on-happy-independence-day-attacked-on-bjp-government-ask97
पुढे त्यांनी भाजपवर निशाणा साधत म्हटले कि, “राजकीय स्वार्थासाठी ऐतिहासिक तथ्यांवरील कोणत्याही चुकीच्या मांडणीला आणि गांधी-नेहरू-पटेल-आझादजी यांसारख्या महान राष्ट्रीय नेत्यांचा जो खोटा इतिहास पसरवला जात आहे त्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस प्रयत्नाला जोरदार विरोध करेल.” याचबरोबर त्यांनी भारताच्या लोकशाहीच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केलंत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Independence Day | परिवारवाद देशासाठी धोकादायक आहे, त्याचे शुद्धीकरण आवश्यक आहे – पंतप्रधान मोदी
- Independence Day | “गांधींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी स्वत:ला समर्पित केले” ; लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचे संबोधन
- Minister Portfolios । खाते वाटपात भाजपचे वर्चस्व; फडणवीसांकडून आपल्याच मंत्र्यांशी ‘सावत्रपणा’
- Dipali Sayyed | विनायक मेटे यांच्या निधनानंतर दिपाली सय्यद भावुक
- Vinayak mete Accident | विनायक मेटेंचा अपघात कि घातपात – आबासाहेब पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
