नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.
गेल्या 24 तासात देशात 4,01, 993 नव्या रुग्णांची भर पडली असून 3,523 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. शुक्रवारी देशात जवळपास तीन लाख रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्या आधी गुरुवारी देशात 3.86 लाख रुग्णांची भर पडली होती. कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जगभरातील एकाच दिवशी वाढणाऱ्या रुग्ण संख्येपैकी 40 टक्के रुग्णसंख्या ही एकट्या भारतात वाढत असल्याचं समोर आलं आहे.
देशात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत. इतकेच नाही तर मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील वेटिंग लिस्ट आहे. देशात काही ठिकाणांवर तर पार्किंगच्या जागेवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आहे आहे. देशातील ही भयावह परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका परदेशी माध्यमांनी ठेवला आहे. कधीकाळी मोदींच्या नावाचे गोडवे गाणारा परदेशी मिडिया आज मोदींवर सडकून टीका करत आहे.
कोरोना संकटाच्या काळात निवडणूक सभा आणि कुंभ मेळा आयोजन करण्याचा निर्णय चुकीचा होता, असे या माध्यमांत म्हणण्यात आले आहे. सर्वात नवे वृत्त अमेरिकेतील टाइम मॅक्झिनमध्ये “How Modi Failed Us” शीर्षकाखाली प्रसिद्ध झाली आहे. ते भारतीय पत्रकार राणा अयूब यांनी लिहिले आहे. भारतातील मजबूत सरकारने गोष्टींकडे दूर्लक्ष केले, असेही यात म्हणण्यात आले आहे.
India's COVID-19 crisis is spiraling out of control. It didn't have to be this way https://t.co/jMaL7wZSx7 pic.twitter.com/QA9FCsH6Qp
— TIME (@TIME) April 29, 2021
टाइम मॅक्झिनच्या वृत्तात, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्याच्या तयारीत कमतरतेसाठी सरकारला जबाबदार धरण्यात आले आहे. या वृत्तात म्हणण्यात आले आहे, की पंतप्रधानांनी कुंभ मेळा ‘सांकेतिक’ पद्धतीने करा, असे आवाहन करण्यास उशीर केला. तसेच, उपचारांअभावी हजारो लोकांना जीव गमवावा लागला. मात्र, देशातील मोठे नेते निवडणूक प्रचारात व्यस्त होते.
Prime Minister Narendra Modi’s government, which just months ago was declaring victory over the pandemic, has been accused of turning a blind eye to the risks of a resurgence at the same time as cracking down on India’s democratic freedoms https://t.co/ys0VZm9V0c
— TIME (@TIME) April 30, 2021
द टाइम मॅक्झिनप्रमाणेच अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स आणि इग्लंडमधील न्यूजपेपर द गार्डियननेही वृत्त प्रसिद्ध केले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने “As Covid 19 Devastates India, Deaths Go Undercounted” या शिर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. जेव्हा कोरोनाने भारतात थैमान घातले होता, तेव्हा मृत्यूची संख्या कमी सांगितली जात होती. आकड्यात हेराफेरी केली जात आहे, असे या वृत्तात म्हणण्यात आले आहे.
In India, people are dying while waiting to see doctors as the second wave of the coronavirus rapidly evolves into a devastating crisis, with mounting evidence that the actual death toll is far higher than officially reported. https://t.co/aWkyHU3qyF
— The New York Times (@nytimes) April 24, 2021
‘द ऑस्ट्रेलियन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात म्हणण्यात आले आहे, की अहंकार, अती राष्ट्रवाद आणि नोकरशाहीच्या अयोग्यतेने भारतात कसे कोरोना संकट वाढले. यातच गर्दी आणि गर्दीत राहणे पसंत करणारे पंतप्रधान आपल्यातच व्यस्त राहिले आणि नागरिक गुदमरत राहिले. ‘द ऑस्ट्रेलियन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या या वृत्तासंदर्भात कॅनबरा येथील भारतीय दुतावासाने तीव्र आक्षेप देखील व्यक्त केला होता.
Arrogance, hyper-nationalism and bureaucratic incompetence have combined to create a crisis of epic proportions in India, with its crowd-loving PM basking while citizens suffocate. This is the story of how it all went so terribly wrong #coronavirus https://t.co/bL8VXkz5RD
— The Australian (@australian) April 25, 2021
महत्वाच्या बातम्या
- कोरोनाच्या काळात गैरहजर ग्रामसेवकाची बदली करा! ग्रामस्थांची मागणी
- एकनाथ खडसेंनंतर आता गुलाबराव पाटलांनी गिरीश महाजनांना डिवचले, म्हणाले..
- लातूर पोलिसांच्या ताफ्यात २८ चारचाकी व ५१ दुचाकींचा समावेश; अमित देशमुखांचा पुढाकार!
- ‘..मग इतक्या दिवस तुम्ही काय केले?’, चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- ऐन कोरोनाच्या काळात मनपातून तज्ज्ञ अधिकारी सेवानिवृत्त!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

