Share

‘या’ कारणामुळे मोदींनी गुजरातला तात्काळ मदत जाहीर केली ; फडणवीसांचा खुलासा

Published On: 

रायगड : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने सरकलं असलं तरी कोकणातील गावांसह पश्चिम महाराष्ट्रात देखील सोसाट्याचा वारा व मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान केलं आहे. पुढे हे तौत्के चक्रीवादळ सौराष्ट्रच्या किनारपट्टीजवळ गुजरातमध्ये धडकले.

दरम्यान, या वादळानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप हे सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. तौत्के चक्रीवादळाचा गुजरातला जोरदार तडाखा बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादळग्रस्त भागाची बुधवारी दुपारी पाहणी केली. या दौऱ्यानंतर झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी गुजरातसाठी तब्बल एक हजार कोटींच्या मदतनिधीची घोषणा केली आहे. परंतु पंतप्रधान मोदींनी गुजरातला मदत केल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला देखील या चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे मोडी यांनी महाराष्ट्राला देखील मदत करणे अपेक्षित आहे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. चक्रीवादळग्रस्त असलेल्या कोकण दौऱ्यावर असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की, पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला महाराष्ट्राकडे कमी लक्ष दिले? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला याचं कारण म्हणजे लँडफॉल गुजरातमध्ये झालं. गुजरातमध्ये लँडफॉल झाल्याने प्रचंड नुकसान झालं. 45 नागरिकांचा मृत्यू झाला. गावंच्या गावं 100 टक्के उद्वस्त झाली त्यामुळे पंतप्रधानांनी गुजरातचा दौरा केला, तातडीची मदत केली.’

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘इतर राज्यांनाही मदत करण्यात येईन असं जाहीर केलं आहे. तौत्के चक्रीवादळाचा परिणाम केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दमण, दीवमध्ये आहे एकूण आठ राज्यांत चक्रीवादळाचा परिणाम झाला आहे या सर्व राज्यांना केंद्र सरकारच्या वतीने मदत देण्यात येईल.’ असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

दरम्यान, ‘महाराष्ट्राला बसलेला फटका पाहता पंतप्रधान महाराष्ट्राला दीड हजार कोटींची मदत जाहीर करतील,’ असा टोला उपरोधिक टोला शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!