🕒 1 min read
नवी दिल्ली: कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवरून विरोधकांनी अनेक सवाल केले गेले.लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो छापण्याची काय गरज आहे असा प्रश्न विरोधकांकडून करण्यात आला होता. आता यासर्व प्रकरणावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.
पंतप्रधान मोदींचा फोटो आणि त्या सोबतचा संदेश हा या प्रमामाणपत्रावर छापण्यामागे जनजागृती करण्याचा हेतू असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. कोरोना संदर्भातील नियम लसीकरणानंतरही पाळावेत हे लोकहिताच्या दृष्टीने महत्वाचं आहे, हाच संदेश देण्यासाठी मोदींचा फोटो या प्रमाणपत्रावर छापण्यात आला असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.
लसीकरण प्रमाणपत्राची रचना ही जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांनुसार आहे. या प्रमाणपत्रासंदर्भात विचार करताना कोरोनाबाबतचा जनजागृती संदेश तसेच लसीकरणानंतरही कोरोना नियमांचे पालन करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली असल्याचे आरोग्य राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आणि त्यासोबत असणाऱ्या संदेशातून जनजागृती करण्यात येत आहे असे मत भारती पवार यांनी व्यक्त केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला तरी, रोहित-विराट राहणार पदकापासुन वंचित
- भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मोईन अलीचे संघात पुनरागमन
- महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…
- ‘अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उत्थानासाठी समिती गठित करणार’- वर्षा गायकवाड
- ‘MPSC आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची नियुक्ती’; प्रीतम मुंडे लोकसभेत कडाडल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
