Share

विधानपरिषदेसाठी महाविकासआघाडीने किंवा राज्यपालांनी माझ्या नावाचा नक्की विचार करावा – सुरेखा पुणेकर

Published On: 

🕒 1 min read

पुणे – महाराष्ट्रात सध्या राज्यपालनियुक्त विधान परिषद जागांची चर्चा आहे. बारा जागांसाठी महाविकास आघाडीतील सत्ताधारी शिवसेना- राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षात अद्याप कुणी किती जागा घ्यायच्या यावर अजून एकमत झालेले नाही. मात्र या जागांवर वर्णी लावण्यासाठी अनेकांकडून फिल्डिंग लावली जात आहे.

लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची पुणे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून चर्चा झाली. पण, उमेदवारी काही मिळाली नाही. आता सुरेखा पुणेकर विधानपरिषदेला तरी उमेदवारी मिळेल, अशी आशा बाळगून आहेत. ‘महाराष्ट्र देशा’ बरोबर बोलताना आयुष्यभर लोककला जपणाऱ्या सुरेखा पुणेकर यांनी सर्वच पक्षांना आपणास उमेदवारी द्यावी अशी विनंती केली आहे. जर पक्षांनी उमेदवारी दिली नाही तर कमीत कमी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी तरी माझ्या नावाचा विचार करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

या संदर्भात त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याची पुणेकर यांचा संपर्क होऊ शकला नाही. गरज पडली तर पवारांची भेट देखील घेऊ असं त्या म्हणाल्या. याशिवाय शिवसेनेकडून देखील उमेदवारी मिळेल अशी आशा पुणेकर यांना आहे.

सध्या कोरोनामुळे लोककलावंत मोठ्या समस्यांचा सामना करत आहेत मात्र यावर कुणीही बोलताना दिसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘आम्हा तमाशा कलावंतांचे अनेक प्रश्न असतात. हे प्रश्न कोणी मांडताना दिसत नाही. त्यामुळं या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आमच्यातील एक तरी प्रतिनिधी विधानपरिषदेत असायलाच हवा. कलाकारांचा आवाज बनण्यासाठी मी तयार असून सर्व राजकीय पक्षांनी मला उमेदवारी देवून न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोककलावंतांच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, ‘लावणी, तमाशा या कलेला आज समाजात मानाचे स्थान आहे. पण, तमाशा कलावंतांची अवस्था खूप वाईट आहे. कलावंत सगळ्यांचं मनोरंजन करतो. पण, त्यांचे हाल पाहवत नाहीत. आजवर एकाही आमदार किंवा खासदाराने त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडलेली नाही. त्यामुळेच आम्हाला प्रतिनिधित्व हवे आहे.’

मुंबईत शिथिलता दिली तर कोरोनाबाधितांची संख्या वाढेल : उद्धव ठाकरे

विधानसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

भाजपमध्ये धुसफूस : कवितेच्या दोन ओळी पोस्ट करत मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केली नाराजी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!