Share

मुंबईत शिथिलता दिली तर कोरोनाबाधितांची संख्या वाढेल : उद्धव ठाकरे

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊन वाढवण्यात येत असला तरी काही भागात शिथिलता देण्यात येणार आहे. मात्र मुंबईत शिथिलता दिली तर मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचा धोका आहे. ही संख्या ५० हजारांवर जाईल, अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी महापौर बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. तिसऱ्या टप्प्यानंतर राज्यातील लॉकडाऊन उठवता येईल का, यावर चर्चा झाली. काही मंत्र्यांनी त्याबद्दल अनुकुलता दर्शविली; मात्र कोणत्याही परिस्थितीत मुंबई, पुणे, औरंगाबाद, मालेगाव या भागात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन उठवू नये, यावर सर्वांचे एकमत झाले.

तर वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा रीतीने मुकाबला करीत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांचे त्यांच्या राज्यात ने आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाºया अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली. राज्यात २० एप्रिलनंतर ग्रीन व आॅरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग- व्यवसायांना सुरु करण्यात आले आहेत.

दरम्यान राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 27 हजार 524 वर गेला आहे. तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 81 हजार 970वर गेला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन काढला तर खासकरून मुंबईतील लॉकडाऊन काढला तर कोरोनाबाधितांची संख्या वाढेल, अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

भाजपने सावध राहावे अन्यथा नव्या भूकंपाची वात पेटेलं, शिवसेनेचा सल्ला

कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय – अजित पवार

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!