🕒 1 min read
औरंगाबाद: संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुन्हा नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र भुमरेंनी अर्ज मागे घेतल्यामुळे बाजीपलटली आणि नितीन पाटील यांची बिनविरोध अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर दुसरीकडे उपाध्यक्षपदासाठी चुरस दिसून आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदासाठी पाच जणांनी अर्ज दाखल केला होता.
यामध्ये दिनेश परदेशी, आप्पासाहेब पाटील यांनी माघार घेतली तर जगन्नाथ काळे, कृष्णा पाटील डोणगावकर आणि अर्जुन गाढे हे उपाध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत. दुपारी एक वाजे दरम्यान या तिघांमध्ये उपाध्यक्षपदासाठी निवड होणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. जिल्हा बँकच्या निवडणुकीच्या २० जागांसाठी २१ मार्चला मतदान झाले होते.
या निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला, यात शेतकरी पॅनलने १४ जागा जिंकल्या. यात जेष्ठ संचालक हरिभाऊ बागडे यांचा [पराभव झाला होता.त्यामुळे राजकारण बदलले, कृष्णा पाटील डोणगावकर व त्यांच्या पत्नी शिवसेनेत परतल्या, त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ १२ वर पोहोचले म्हणून शिवसेनेचा अध्यक्ष होणार हे सर्वाना कळून चुकले होते. त्यात नितीन पाटील यांनी अध्यक्ष पदावर दावा केल्याने त्यांना अध्यक्ष होण्याचे बहूमान लाभले.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक! बीड जिल्ह्यात रुग्णालय कर्मचारी-नातेवाईकांत हाणामारी
- उपचारात हलगर्जीपणा केल्यास खैर नाही, आ. मेघना बोर्डीकर यांचा सज्जड इशारा
- अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या,मुंबई उच्च न्यायालयाने दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
- लॉकडाऊन लावण्याची वेळ आली तर दोन दिवसांचा वेळ देऊ : अजित पवार
- पुण्यानंतर राज्यात ‘मिनी लॉकडाऊन’ ‘हे’ असणार कडक निर्बंध !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
