Share

पहिल्यांदाच मुंबईने केला २०० पेक्षा धावांचा पाठलाग; ‘या’ संघाने केला सर्वाधिक वेळा पाठलाग

Published On: 

दिल्ली : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढतीत मुंबईने ४ गडी राखुन सीएसकेचा पराभव केला. सीएसकेने दिलेल्या २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे करत ४ गडी राखुन मात केली. वादळी अर्धशतकासाठी मुंबईच्या कायरान पोलार्डला सामनावीराच्या पुरस्कारनाने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात मुंबईने चेन्नईच्या संघाने दिलेल्या २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे केला. मुंबईने पहिल्यांदाच २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग केला आहे. मुंबईने केलेला हा कारनामा आयपीएलच्या इतिहासातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्स संघ आहे. राजस्थानने २०२० साली पंजाब संघाविरुद्ध २२४ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.

राजस्थानच्या पाठोपाठ आता मुंबईचा नंबर लागतो. तसेच आयपीएलमध्ये आतापर्यंत केवळ सनरायझर्स हैदराबाद हा एकमेव संघ आहे ज्याने २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग केला नाही. आयपीएलमध्ये आत्तापर्यंत पंजाब आणि चेन्नईने सर्वाधिकवेळा म्हणजे तीन वेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. तर राजस्थान आणि केकेआर या संघानी प्रत्येकी २ वेळा हा कारनामा केला आहे. तर दिल्ली, आरसीबी आणि मुंबईने प्रत्येकी १ वेळा २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग

२२४ – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स, शारजाह, २०२०
२१९ – मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली, २०२१
२१५ – राजस्थान रॉयल्स विरुद्ध डेक्कन चार्जर्स, हैदराबाद, २००८
२०९ – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजराज लायन्स, दिल्ली, २०१७

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!