दिल्ली : आयपीएलमध्ये शनिवारी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्या लढतीत मुंबईने ४ गडी राखुन सीएसकेचा पराभव केला. सीएसकेने दिलेल्या २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे करत ४ गडी राखुन मात केली. वादळी अर्धशतकासाठी मुंबईच्या कायरान पोलार्डला सामनावीराच्या पुरस्कारनाने सन्मानीत करण्यात आले.
नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच षटकात सलामीवीर ऋुतुराज गायकवाडला(४) बोल्टने बाद केले. मात्र यानंतर सीएसकेच्या मोईन अली(५८) आणि सलामीवीर फाफ डु प्लेसिस(५०) यांनी आक्रमक फटकेबाजी करत शतकी भागीदारी करत चेन्नईचा डाव सावरला. यानंतर डु प्लेसिस, मोईन अली आणि रैना लागोपाठ बाद झाल्याने सामन्यावर मुंबईने पकड घट्ट केली. मात्र रविंद्र जडेजा(२२) आणि अंबाती रायडू(७२) यांनी खेळपट्टीवर स्थिरावताच बॅटचा पट्टा फिरवत चौकार आणि षटकारांची आतीषबाजी सुरु केली. निर्धारीत २० षटकात चेन्नईने ४ गडी गमावत तब्बल २१८ धावांचा डोंगर उभारला. चेन्नईकडुन अंबाती रायडुने २७ चेंडुत ४ चौकार आणि ७ षटकारासंह सर्वाधीक ७२ धावांची खेळी केली.
Match 27. It's all over! Mumbai Indians won by 4 wickets https://t.co/ouG4uSjHy2 #MIvCSK #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2021
चेन्नईने दिलेल्या अवाढव्य २१९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग कराण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईची सुरुवात विश्वासार्ह झाली. रोहित शर्मा(३८) आणि क्विंटन डिकॉक(३५) यांनी ७ षटकातच ७० धावांची सलामी देत इरादे स्पष्ट केले. मात्र अवघ्या १० धावांच्या अंतराने रोहित, डिकॉक आणि सुर्यकुमार यादव(३) बाद झाले आणि सामना चेन्नईच्या बाजुने फिरला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कायरन पोलार्डने सुरुवातीपासुनच षटकार लगावत चेन्नईच्या गोलंदाजाची धुलाई सुरु केली. शेवटच्या चेंडुपर्यंत मैदानावर पोलार्ड मैदानावर तळ ठोकुन होता. पोलार्डने केवळ ३४ चेंडुत ६ चौकार आणि ८ षटकारासह ८७ धावांची नाबाद खेळी साकारली. आणि महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर मुंबईच्या संघाला अशक्यप्राय विजय मिळवुन दिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘..तर अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, उत्तर कोरियाचा इशारा
- ‘या’ कारणामुळे पराभव झाला, धोनीने सांगितले कारण…
- अबकी बार दीदी २०० पार, भाजपची शंभरीत दमछाक !
- बंगालमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेला तृणमूल कॉंग्रेसचा उमेदवार आघाडीवर
- ‘चंद्रकांत दादांचे पश्चिम बंगालमधील 200 +चे स्वप्न भंगताना पाहून खूप वेदना झाल्या’


