Share

ज्येष्ठांच्या सभागृहात आता भाजप १ नंबर

Published On: 

दिल्ली : भाजप राज्यसभेत काँग्रेसला मागे टाकत सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. ज्येष्ठांच्या या सभागृहात आता भाजपचे ५८ खासदार तर प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या खासदारांची संख्या ही ५७ इतकी झाली आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यसभेत भाजपचे सर्वाधिक खासदार असण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मध्य प्रदेशमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीनंतर राज्यसभेत भाजपचे नूतन खासदार संपतिया उइके यांनी गुरूवारी शपथ घेतली. केंद्रीय मंत्री अनिल दवे यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. उइके हे बिनविरोध निवडून आले आहेत. भाजपच्या नेतृत्वाखाली असलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) या वरिष्ठ सभागृहात निर्णायक बहुमत नाही. पण संयूक्त जनता दल (जेडीयू) बरोबर आल्याने त्यांची ताकद मात्र वाढली आहे. पुढील वर्षीपर्यंत म्हणजे २०१८ पर्यंत राज्यसभेत काँग्रेस पक्षच सर्वांत मोठा पक्ष राहिला असता. पण त्यांच्या दोन सदस्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या खासदारांची संख्या कमी झाली आहे. अनिल दवे यांचे मे महिन्यात निधन झाले होते.
दुसरीकडे, तामिळनाडूमधील सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षही एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास राज्यसभेत भाजपची स्थिती आणखी मजबूत होईल. सध्या अनेक महत्वाच्या विधेयकांच्या वेळी अण्णा द्रमुकने भाजपला साथ दिलेली आहे. मात्र ते अधिकृतरित्या एनडीएचे सदस्य नाहीत. अण्णा द्रमुकचे राज्यसभेत 12 खासदार आहेत.
राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे मोदी सरकारची अनेक महत्त्वपूर्ण विधेयकं अडकली आहेत. राज्यसभेत विधेयक संमत करताना भाजपला आपल्या सहकारी पक्षांशिवाय इतर पक्षांच्या मदतीची गरज भासत असते. पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 9 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यातील 9 पैकी 8 जागांवर भाजपचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!