बीड: लसीकरणासंदर्भात जिल्हा आरोग्य विभागाने काही बदल केले आहेत. आता ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीसाठी जिल्हा परिषदेने तयार केलेल्या अॅपवर नोंदणी बंधनकारक केली आहे. या अॅपमधून नोंदणीनंतर टोकन मिळेल, त्या टोकनचा क्रमांक आल्यानंतर लाभार्थींना मेसेज किंवा कॉल येईल. त्यानंतर त्यांनी लस घेण्यासाठी केंद्रात जायचे आहे. केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद आहे तर, ४५ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना केवळ दुसरा डोस दिला जात आहे. पहिला डोस देणेही बंद आहे. लस पुरवठा कमी असल्याने हा निर्णय शासनाने घेतला आहे. दरम्यान, लसीकरणासाठी कोविन अॅपवरून ऑनलाइन स्लॉट बुक करावा लागे याची मर्यादा केवळ २०० आहे. त्यामुळे अनेकांना बुकिंग मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत असे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ऑफलाइन पद्धतीने ज्येष्ठांना स्पॉट बुकिंगची सुविधा दिली होती. रजिस्टरवर नोंद केल्यानंतर आरोग्य केंद्रातून संपर्क करुन बोलावले जाईल असे सांगितले होते.
मात्र, रजिस्टरवर नोंद करण्यासाठीही शेकडो नागरिकांच्या रांगा केंद्रावर लागल्या होत्या. लस घेण्यासाठी आलेले नागरिक आणि नोंदणीसाठी आलेले नागरिक अशी दुप्पट गर्दी होत असे. तर, दुसरीकडे कोविनवर दोनशेहून अधिक नोंद होत नसल्याची अडचण होती. यावर पर्याय शोधण्यात आला आहे. बीड जि. प. ने गतवर्षी तयार केलेल्या इझी अॅपवर आता ज्येष्ठांची नोंद होणार आहे. ही नोंदणी झाल्यानंतर ज्येष्ठांना एक टोकन क्रमांक मिळेल. त्या टोकन क्रमांकानुसार लस साठा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य केंद्रातून अनुक्रमांकानुसार लसीकरणासाठी नोंदणीकृत मोबाइलवर मेसेज पाठवले जातील किंवा कॉल केला जाईल. ज्यांना मेसेज किंवा कॉल आला त्यांनीच लसीसाठी यायचे आहे. मिळालेल्या टोकन क्रमांकाचा स्टेटसही कळणार आहे. गतवर्षी तयार केलेल्या नीडली अॅपवरून आपल्या टोकन क्रमांकाची स्थिती काय आहे हे कळेल. हा प्रयोग लसीकरणातील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी महत्त्वाचा आहे. – डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.
महत्वाच्या बातम्या
- लोकांचे जीव गेल्यावर व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचे मान्य करणार का? सतिश चव्हाणांचा मोदींना सवाल!
- ‘मराठा आंदोलने होऊ नये म्हणून कोरोनाचे निर्बंध, भाजप आंदोलनात भाग घेणार’
- कोरोना काळात ‘विरु’ बनला ‘अन्नदाता’; ‘एवढ्या’ कोरोना पिडीतांना पाठवले घरपोच जेवण
- बागबान चित्रपटातील ‘या’ अभिनेत्याचा पत्नीसह अपघात
- कोरोना : आता लढाई आणखी कठीण होणार, सज्ज रहा – मुख्यमंत्री ठाकरे

