Share

औरंगाबादेत शिवसेना-एमआयएमच्या वादात प्रलंबित राहिलेल्या ‘या’ कामास मिळाली गती!

Published On: 

औरंगाबाद : महापालिका मुख्यालयापासून जवळच असलेल्या बुढीलेन परिसरातील जुने नेहरु भवन पाडून त्याजागी नवीन शॉपींग कॉम्पलेक्स व नाट्यगृह उभारण्याच्या कामासाठी मनपाने ३२ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. टि.व्ही. सेंटर येथील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर गाळे उभारून कार्यालयीन जागा तीस वर्षांसाठी भाडेतत्वावर दिली जाईल. मागील काही वर्षांपासून एमआयएम या कामासाठी आग्रही होते. मात्र सत्ताधारी शिवसेना व एमआयएमच्या वादात हा विषय आजवर प्रलंबित होता.

१९८० साली तत्कालीन नगरपरिषदेने उभारलेले बुढीलेन येथील नेहरूभवन दुरुस्तीअभावी मागील काही वर्षापासून खिचपत पडलेले आहे. आजघडीला त्याची दयनीच अवस्था झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी जुनी इमारत पाडून नवीन अत्याधुनिक नाट्यगृह उभारावे, अशी मागणी बर्‍याच वर्षांपासून होत होती. पालिकेतील विरोधी पक्ष एमआयएमनेही या ठिकाणी शॉपींग कॉम्प्लेक्स आणि नाट्यगृह बांधण्याची मागणी मध्यंतरी लावून धरली होती. त्यानुसार प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी तसा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला.

मात्र त्याचवेळी एमआयएम आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यातील राजकारणामुळे हा प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला. पुढे दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकार्‍यांमध्ये मनोमिलन झाल्यावर गतवर्षी अखेरच्या टप्प्यात त्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली. तरीही त्यावर कोरोनामुळे पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. आता पालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी पुढाकार घेऊन या कामाची निविदा निकाली काढली आहे. या कामासाठी 32 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली असून निविदा दाखल करण्यासाठी १० जून पर्यंतचा कालावधी दिलेला आहे.

नेहरुभवनच्या या जागेचे क्षेत्रफळ ४०५० चौरस मिटर इतके आहे. आता टिव्ही सेंटर येथील शॉपींग कॉम्प्लेक्स आणि क्रीडांगणाच्या धर्तीवर या जागेचा विकास केला जाणार आहे. टिव्ही सेंटर येथे पालिकेने ५० दुकाने बांधली आहेत. ही दुकाने बांधण्याआधीच ती भाडेतत्वावर देण्यासाठी लिलाव करण्यात आला. लिलाव पद्धतीने अधिक बोली आलेल्या व्यक्तींनी ही दुकाने ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर घेतली. त्यातून मिळालेल्या रकमेतून पुढे बांधकामाचा खर्च केला केला. आता त्याचप्रमाणे नेहरु भवनचा जिर्णोद्धार केला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!