Share

लोकांचे जीव गेल्यावर व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचे मान्य करणार का? सतिश चव्हाणांचा मोदींना सवाल!

Published On: 

औरंगाबाद : लोकांचे जीव गेल्यावर व्हेंटिलेटर निकृष्ट असल्याचे मान्य करणार का असा प्रश्न आमदार सतीश चव्हाण यांनी ट्विट करत व्यक्त केला आहे. पीएम केअर फंडातून घाटी रुग्णालयाला देण्यात आलेल्या व्हेंटिलेटरची त्यांनी गुरुवारी पाहणी केली होती. मराठवाड्यात ज्या ज्या ठिकाणी पीएम केअर अंतर्गत व्हेंटिलेटर पुरवण्यात आले त्या ठिकाणी मी लवकरच भेट देऊन किती व्हेंटिलेटर उपयोगात आले किती बिनकामाचे निघाले याची माहिती घेणार असल्याचेही ते म्हणाले.

पीएम केअर फंडातून घाटी रुग्णालयाला १५० व्हेंटिलेटर देण्यात आले होते. मात्र हे व्हेंटिलेटर निकृष्ट असुन कोरोना रुग्णांच्या वापरायोग्य नाही. आयसीयु कक्षात लावण्याच्या दर्जाचे नाहीत असा स्पष्ट अहवाल घाटी रुग्णालयात यासंदर्भात नियुक्ती केलेल्या खात्यातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने दिला आहे. हा प्रश्न समोर आल्यानंतर केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने दखल घेतली परंतु घाटीतील तज्ञ डॉक्टरांच्या समितीने प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल तयार केला. हा अहवाल खोटा कि केंद्राचा आरोग्य मंत्रालयाने दिले निवेदन खोटे असा प्रश्न आमदार चव्हाण यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्रातच नाही तर पंजाब, राजस्थान याठिकाणीही सीएम फंडातून देण्यात आलेली व्हेंटिलेटर सदोष बिनकामाचे निघालेत. गुजराती कंपन्यांवर इतकी मेहेरनजर का ? मेक इन इंडियाच्या नावाखाली लोकांचा जीव घेणार का असा प्रश्न आमदार सतीश चव्हाण यांनी केंद्र सरकारला विचारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांनी १५ मे रोजी उच्चस्तरीय बैठक घेतली.

अनेक राज्यांना दिलेले व्हेंटिलेटर बिनकामाचे असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पंतप्रधानांनी राज्यातील ज्या ज्या ठिकाणी हे व्हेंटिलेटर दिले आहेत त्याच्या ऑडिट करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला दिले असल्याचे समजते. यातून भाजपचे नेते योग्य तो बोध घेऊन राज्य सरकारवर टीका करणार नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!