Share

शिवसेनेसाठी कायम ‘विकास’ हाच महत्वाचा केंद्रबिंदू – आ. अंबादास दानवे

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सत्ता असो वा नसो शिवसेनेने कायम जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याबरोबरच विकासकामांना महत्त्व दिले आहे. आणि त्यामुळेच शिवसेनेसाठी गावाचा विकास हाच महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. सातत्याने कन्नड तालुक्यातील जनता कायम शिवसेनेच्या पाठीशी उभी आहे आणि आज तर शिवसेना सत्तेत आहे. शिवसेना पक्षप्रमुख आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अजून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून टाकू असे प्रतिपादन शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले.

कन्नड तालुक्यात सोमवारी ( दि.२०.) विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते. औरंगाबाद जिल्हा परिषद, जन सुविधा योजना व पर्यटन विभागाच्या अंतर्गत कन्नड तालुक्यात आमदार अंबादास दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार उदयसिंह राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. या विकास कामात वासडी येथील रस्ता डांबरीकरणाचे भूमिपूजन, त्याचप्रमाणे नागपूर ते किल्ले अंतुर रस्त्याचे डांबरीकरण करणे यांचा समावेश आहे.

यासोबतच वासडी येथे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे, शाळा दुरुस्त करणे, भूमिगत गटार बांधकाम करणे, स्ट्रीट लाईट बसवणे, सभागृह बांधकामाचे लोकार्पण अशा विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार उदयसिंह राजपूत यांनी तालुक्यातील गावांच्या विकास कामांना प्राधान्य देऊन जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहू असे अभिवचन दिले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अवचित वळवळे, तालुकाप्रमुख केतन काजे, गोकुळ डहाके आदी ग्रामस्थ नागरिक शिवसैनिक उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!