🕒 1 min read
औरंगाबाद : देशाच्या राजकारणात पवार कुटुंबावर झालेल्या आरोपांऐवढे आरोप कोणावरच झालेले नाही. तरी देखील आम्ही प्रत्येकाला संयमाने उत्तर दिले. त्यामुळे आता या सर्वांची सवय झाली असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. देशात सुरू असलेल्या ईडी आणि सीबाआयच्या वापरावर देखील त्यांनी भाष्य केले. औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
किरीट सोमय्या यांच्या आरोपनाट्याचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला. तुम्ही ईडीचे प्रमुख, सीबीआयचे अध्यक्ष किंवा पोलीस महासंचालक असल्याप्रमाणे कोणत्याही कार्यालयात जावून कागदपत्रांची तपासणी करता. याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रीय एजन्सीचा अशा प्रकारे वापर कधीही झाला नव्हता. ही आपली संस्कृती नसल्याचेही त्या म्हणाल्या.
वाहतूक सिग्नलवर नियमांचे उल्लंखन केल्यावर ज्या प्रमाणे वाहतूक हवालदार चलान कापतो. त्याच प्रमाणे ईडी आणि सीबीआय सारख्या संस्था काम करत असल्याचा आरोप खासदार सुळे यांनी केला. सोमय्या आजपर्यंत ज्या-ज्या ठिकाणी गेले, त्या-त्या ठिकाणी आम्ही त्यांचे स्वागत केले. हा आमचा सुसंस्कृतपणा आहे. ज्यांच्यावर तुम्ही खोटे-नाटे आरोप करत आहात, त्या घरातील मुले, स्त्रीया यांच्यावर काय परिणाम होत असेल, याचा विचारही आपण करत नाही, इतके असंवेदनशील झालो असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
