मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके आढळलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू मागील गूढ वाढत आहे. हिरेन यांच्या पत्नीने शिवसेनेशी पूर्वसंबंध असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आज अर्थसंकल्पीय अधिवेशन संपुष्टात आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. दरम्यान, सचिन वाझेंवर कारवाईबाबत प्रश्न माध्यमांनी केला असता उद्धव ठाकरेंनी, ‘ते लादेन नाहीत,’ असं विधान केलं आहे.
सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय असं मुख्यमंत्री म्हणत आहेत… हत्या झालेल्या मनसुख हिरेनाच्या पत्नीला नक्कीच तसं वाटतंय आणि त्यामुळे जनतेच्या मनात देखील तसाच संशय निर्माण झाला आहे…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 10, 2021
याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरेंनाटोला लगावला आहे. ‘सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय असं मुख्यमंत्री म्हणत आहेत… हत्या झालेल्या मनसुख हिरेनाच्या पत्नीला नक्कीच तसं वाटतंय आणि त्यामुळे जनतेच्या मनात देखील तसाच संशय निर्माण झाला आहे…’ अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिलेली आहे.
‘मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. आधी फाशी द्या आणि मग तपास करा, अशी तपासाची पद्धत नसते. कुणी तपासाला दिशा देऊ शकत नाही. एखाद्याला टार्गेट करायचं आणि त्याला आयुष्यातून उठवायचं अशी पद्धत सध्या सुरू आहे, असं सांगतानाच सचिन वाझे हे ओसामा बिन लादेनच आहेत, अशा पद्धतीने चित्रं तयार केलं जात आहे. ते कशासाठी?,’ असा सवालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘देशात राहुल गांधींना आणि राज्यात नाना पटोलेंना कोणीही महत्व देत नाही’
- सचिन वाझेंना वकिलांची गरज नाही, उद्धव ठाकरेच त्यांचे वकील आहेत !
- ‘अंशत: लॉकडाऊनमध्ये बाजार समिती पूर्णपणे बंद ठेवणे अयोग्य’
- अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर शासनाला जाग, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘देवेंद्रजींना पुन्हा यावचं लागेल, अजितदादा तुम्ही पण या…’ भाजप नेत्याची विधानसभेतच ‘पुन्हा’ साद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

