Share

सचिन वाझेंना वकिलांची गरज नाही, उद्धव ठाकरेच त्यांचे वकील आहेत !

Published On: 

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके आढळलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यू मागील गूढ वाढत आहे. हिरेन यांच्या पत्नीने शिवसेनेशी पूर्वसंबंध असलेल्या पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशन संपुष्टात आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यावेळी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते. दरम्यान, सचिन वाझेंवर कारवाईबाबत प्रश्न माध्यमांनी केला असता उद्धव ठाकरेंनी, ‘ते लादेन नाहीत,’ असं विधान केलं आहे.

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद संपताच देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाष्यावर सडकून टीका केली आहे. ‘सचिन वाझेंना वकिलांची गरज नाही. त्यांच्याकरता उद्धव ठाकरेच वकील आहेत. त्यामुळे त्यांना दुसरा वकील नेमण्याची आवश्यकता नाही. सबळ पुरावे असून देखील उद्धव ठाकरे या व्यक्तीची पाठराखण करत आहेत. सचिन वाझेंकडे अशी काय माहिती आहे ? त्यांचा काय फायदा आहे ? अशी काय गोष्ट आहे ? ज्यांच्याविरोधात पुरावे असून कारवाई होत नाही,’ असं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे ?

‘या प्रकरणाचा तपास सुरु आहे. आधी एखाद्याला फासावर लटकवायचं आणि मग तपास करा, अशी पद्धत नसते, चौकशी ही निःपक्षपातीपणे झाली पाहिजे. एखाद्याला टार्गेट करून चारित्र्यहनन करायचं असं राजकारण सुरु झालं आहे. हिरेन यांच्या कुटुंबीयांनी तक्रार केली आहे. या तक्रारीची आम्ही दखल घेतली आहे. मात्र, सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन असल्याचं चित्र उभारलं जात आहे,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना फटकारलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!