Share

Hydrated Body | उपवासाच्या काळात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टींचे करा सेवन

Published On: 

🕒 1 min read

सध्या नवरात्री उत्सव सुरू आहे. हा उत्सव नऊ दिवसांचा असतो. या दिवसांमध्ये अनेकजण उपवास करत असतात. काहीजण उठता-बसता उपवास म्हणजेच देवी स्थापन होण्याचा दिवस आणि देवी उठण्याच्या दिवशी करतात. तर काही संपूर्ण नऊ दिवस उपवास करत असतात. या उपवासाच्या दिवसांमध्ये केवळ काही ठराविक पदार्थच खाल्ले जातात. यामध्ये साबूदाणा, वरई अशा पदार्थांचा जास्त समावेश असतो आणि हे पदार्थ पचण्यात जड असतात. त्याचबरोबर या काळात पाणीही जास्त प्यायले जात नाही. त्यामुळे काहींना अशक्तपणा येतो. जर आपले शरीर हायड्रेटेड नसेल तर अशी लक्षणं दिसू लागतात. तर आज आम्ही तुम्हाला काही असे काही उपाय सांगणार आहोत जे प्यायल्याने तुमची बॉडी हायड्रेटेड होण्यात मदत होईल.

बॉडी हायड्रेटेड ठेवण्याचे उपाय –

1. दही –

दह्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. जे उपवासाच्या वेळीही शरीराची उर्जा टिकवून ठेवतात तसेच तुम्हाला हायड्रेटही ठेवण्यात मदत करतात. त्यामुळे उपवासाच्या वेळी दह्याचे सेवन करा.

2.नारळ पाणी –

नारळाच्या पाण्यात असलेले पोटॅशियम शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यामुळे पचनाच्या समस्या दूर होतात. त्यामुळे आपले पोट साफ राहते आणि त्वचाही चमकदार होते.
3. काकडी –

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते. जे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यासोबतच त्यामध्ये असलेले घटक शरीरातील टॉक्सिन्सही काढून टाकतात. त्यामुळे उपवासाच्या दिवशी काकडीचा आहारात समावेश करा.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!