Share

फूडपार्क प्रस्ताव अडकला लालफितीत; वर्षभरापूर्वी झाली होती घोषणा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ९ जानेवारी २०२० रोजी औरंगाबाद शहरात बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कमध्ये फूडपार्क उभारण्याची घोषणा केली होती. यानंतर कोरोना संसर्गामुळे पुढील कार्यवाही पुर्ण नाही होऊ शकली. लॉकडाउन ओसरल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिप लिमिटेड (एआयटीएल) संचालक मंडळाच्या बैठकीत फूडपार्कच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. पण फूडपार्क प्रकल्प आहवाल सादर करण्यासाठी मुहूर्त लागत नाहीये.

महारष्ट्र एक्स्पो २०२० च्या उद्घाटन समारंभासाठी आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कमध्ये ५०० एकरात फूडपार्क उभारण्याची घोषणा केली होती. आता एआयटीएल संचालक मंडळाची बैठक फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार आहे. त्या बैठकीत फूडपार्क चे ले-आऊट, डिझायनिंग, इस्टिमेंट व टेंडर चा खर्च आदींचा प्रकल्प आहवाल सादर केला जाईल. या प्रकल्प आहवालास मान्यता मिळाल्यानंतर मार्चआखेरपर्यंत फूडपार्कच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल.

बिडकीन इंडस्ट्रिअल पार्कमध्ये सर्व पायाभूत सुविधा तयार आहेत. पण त्याठिकाणी अद्याप एकही अँकर प्रोजेक्ट आलेला नाही. फूडपार्क ला सुरुवात झाली तर देश विदेशीतील मोठे उद्दोग गुंतवणूक करण्यासाठी पुढे येतील. बैठका, घोषणा आणि पाहणी यापलीकडे शासन यंत्रणा हालचाल करत नाही असे उद्योजगांचे म्हणणे आहे. ऑरिकचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांच्या माहिती नुसार फूडपार्कच्या प्रकल्प आहवालास मान्यता मिळाल्यानंतर मार्चआखेरपुर्वी पुढील कामाला सुरुवात होऊ शकते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!