Share

‘अण्णांची लोकशाहीवर दृढ श्रद्धा; त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल अण्णांचा आभारी’

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : केंद्रातील भाजप सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर आधीच शेतकरी आंदोलनाने दिल्लीत वातावरण तापलेले आसताना आता अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढणार असं चित्र निर्माण झालं होतं. अण्णांनी हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी भाजप कडून राज्यासह केंद्रातून प्रयत्न करण्यात आले. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुमारे आठवड्याभरापासून प्रयत्न सुरु केले होते.

मात्र, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस व भाजपच्या इतर नेत्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन शुक्रवारी पुन्हा एकदा अण्णांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस व अण्णा हजारे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन उपोषण मागे घेतल्याची माहिती दिली आहे. यांनतर अण्णा हजारेंनी ‘दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो, असे ट्विटही फडणवीस यांनी केले आहे.’

आधीच्या काही मागण्या केंद्र सरकारने आश्वासन देऊन देखील पूर्ण केल्या नव्हत्या, यामुळे नाराज होऊन अण्णा हजारे यांनी त्या मागण्या व कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ३० जानेवारी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनापासून उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!