Share

देवीचे तुळजापूर हादरले! नववीच्या विद्यार्थिनीला पळवून नेत सामूहिक अत्याचार

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : मुलींवरील अत्याचाराच्या वारंवार घडणाऱ्या घटनांनी जिल्हा हादरून गेला आहे. तुळजापूरच्या अणदूर येथील नववीच्या विद्यार्थिनीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, अणदूर येथील ही पीडित मुलगी नराधम राहात असलेल्या घराच्या शेजारी वास्तव्यास होती. बुधवारी दुपारी तिघे नराधम जबरदस्तीने तिच्या घरात शिरले. मुलीला बळजबरीने घरातून उचलून घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी सागर घोडके, मुकेश भोरे, आनंद घोडके या नराधमांवर बाललैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना अटक झाली असून तिसरा आरोपी आनंद घोडके फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, उस्मानाबाद शहरात एका गतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना १५ दिवसांपूर्वी घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणात आणखी एक आरोपी फरार असल्याचा मुलीच्या नातेवाइकांचा आरोप आहे. पोलिसांनी संबंधित आरोपीचा शोध घ्यावा, अशी मागणी करण्यात नातेवाईकांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!