पटना : जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. आता काहीअंशी जनजीवन सुरळीत होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान,बिहार राज्यातील इयत्ता 9 वी च्या पुढील वर्गांच्या शाळा आणि कोचिंग क्लास 4जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समूहाने कोविड सुरक्षेचे सर्व खबरदारीचे उपाय पाळत वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. सर्व काही यथास्थित झाल्यास आगामी काळात टप्प्या टप्प्याने खालच्या इयत्तांचे वर्गही सुरु करण्यात येतील. सानिटायझेशन आणि कोविड सुरक्षा पाळण्याची जबाबदारी सर्व शाळा आणि कोचिंग क्लास यांची राहणार आहे. सरकारी शाळातील प्रत्येक विद्यार्थ्याला सरकारच्या वतीने प्रत्येकी 2 मास्क मोफत देण्यात येणार आहेत.
दरम्यान,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, प्रदीर्घ काळानंतर मध्यप्रदेशात काल पासून इयत्ता 9 वी ते 11 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी शाळा सुरु झाल्या आहेत.नियमावलीनुसार या व्यतिरिक्त अन्य निर्णय घेण्यासाठी आज पालक शिक्षक बैठक घेण्याचे आदेशही मध्यप्रदेशच्या सार्वजनिक शिक्षण आयुक्त जयश्री कियावत यांनी दिले आहेत .
शाळा सुरु करताना राज्य सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती अॅपद्वारे नोंदवण्यात येणार असून, शाळेतील प्रार्थनेसह सर्व सामुहिक कार्यक्रमांवर सध्या बंदी असेल. शाळेतील उपलब्ध वर्ग खोल्या आणि शिक्षकांची संख्या लक्षात घेऊन, इयत्ता 9 वी ते 11 वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय शाळा प्रमुखांनी घ्यायचा आहे.
महत्वाच्या बातम्या
- शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार : मोदी
- नव्या कृषी कायद्यांबाबत बिहारमध्ये कोणतीही अडचण नाही : नितीशकुमार
- मोबाईल धारकांसाठी महत्त्वाची बातमी; ‘यामुळे’ डिअ;ॅक्टिवेट होऊ शकतं सिम कार्ड !
- ई-कॉमर्स नंतर आता अमेझॉन आणणार अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार !
- पुत्र मोह सोडा, लोकशाही वाचवा; ‘या’ नेत्याने सोनिया गांधींना दिला सल्ला!


