Share

ई-कॉमर्स नंतर आता अमेझॉन आणणार अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार !

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन आता वाहन उद्योग क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहे. अमेझॉनने एक अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार तयार लेली आहे. म्हणजे गाडीला स्टिअरिंग नाही. तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात वाहन क्षेत्रात येणारे नवनवीन बदल ग्राहकांकडून नेहमीच स्वीकारले जात असल्याने अमेझॉनची हि अद्ययावत कारची ग्राहकांना प्रतीक्षा आहे.

जगभरात सध्या प्रदूषण आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळं आणि टंचाईमुळं इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामध्ये वाढ झाली आहे. अनेक कंपन्या यावर काम करत असून विना ड्रायव्हरच्या गाड्या देखील लवकरच पाहायला मिळणार आहे. अमेझॉनने देखील यामध्ये उडी घेतली असून त्यांनी एक युनिक अशी सेल्फ ड्रायव्हिंग टॅक्सीचा प्रोटोटाइप तयार केला आहे. सध्या याची टेस्टिंग सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी अमेझॉननी एक स्टार्टअप झूक्स खरेदी केलं होतं त्यावरूनच या प्रोजेक्टचं आणि गाडीचं नाव झूक्स ठेवण्यात आलं आहे. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को आणि लास वेगासमध्ये याचे टेस्टिंग सुरु असून लवकरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

ही गाडी खूपच खास असून याला स्टिअरिंग नाही. या गाडीमध्ये चार जण बसू शकतात. इलेक्ट्रिक गाडी असल्याने याला जबरदस्त बॅटरी देण्यात आली नाही. ताशी 75 मैल म्हणजेच 120 किलोमीटर प्रतितास इतक्या वेगानं ही गाडी धावू शकते. बॅटरी बॅकअप हा 16 तासांचा असून नॉनस्टॉप ही गाडी 16 तास धावू शकते. यासाठी यामध्ये 133 kWh ची बॅटरी दिली आहे. या गाडीच्या चाकांमुळे ती पार्क करण्यास देखील सोपी आहे. याचबरोबर गाडी पुढच्या आणि मागच्या दोन्ही दिशेने चालू शकते म्हणजे रिव्हर्स घेण्याची भानगडच नाही.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाडीचा अपघात होऊ नये यासाठी देखील काळजी घेण्यात आली आहे. यासाठी गाडीमध्ये कॅमेरा, रडार आणि लीडर सेन्सर बसवले आहेत. यामुळं गाडी रस्त्यावर 360 डिग्री कोनांतून नजर ठेवू शकणार आहे. त्यामुळे रस्त्यात मध्ये माणूस, कुत्रं किंवा एखादी वस्तू आली तरीही ही गाडी ते सेन्स करून वेग कमी करेल किंवा थांबेल.

या गाडीचं टेस्टिंग यशस्वी झालं तर लवकरच इलेक्ट्रॉनिक गाड्यांच्या यादीत या अद्भुत गाडीचा समावेश होणार आहे. याआधी देखील अनेक कंपन्यांनी आपल्या गाड्यांचं टेस्टिंग केलं असून या गाडीच्या जबरदस्त फीचरमुळं ही गाडी अल्फाबेटची वेमो, जीएमची क्रुझ तसेच उबेर आणि टेस्लाच्या गाडयांना टक्कर देऊ शकते. सध्या प्रोटोटाइप दिसत असला तरीही प्रत्यक्ष ही गाडी रस्त्यांवर धावू लागली तर एक नवलच होईल. अमेझॉन वेगवेगळ्या व्यवसायांत कार्यरत असून, संशोधनाधारित सेवा, वस्तू निर्माण करून त्या विकण्यावर त्यांचा भर असतो.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!