Share

नव्या कृषी कायद्यांबाबत बिहारमध्ये कोणतीही अडचण नाही : नितीशकुमार

Published On: 

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायद्यांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या सीमेवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले. सत्ताधारी पक्षाकडून आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्यात आल्या, मात्र यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याचे दिसते.

दरम्यान, संसदेनं मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांशी कुठल्याही मुद्यावर चर्चा करायला केंद्र सरकार तयार आहे. या नव्या कायद्यांमुळे पिकांना मिळणारा हमीभाव सुरूच राहणार आहे; तसंच कृषी उत्पन्न बाजार समितीही सुरूच राहील, हमी भाव आणि बाजार समित्या बंद होणार नाहीत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिली आहे.

दरम्यान, नव्या कृषी कायद्यांबाबत बिहारमध्ये कोणतीही अडचण नसल्याचं मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितलं आहे. ते आज पाटणा इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यात चालू हंगामातील धान खरेदीचे उद्दीष्ट 45 लाख मेट्रिक टन निश्चित करण्यात आली असून दोन लाख मेट्रिक टन धानाची यापूर्वीच खरेदी केली गेली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच याबाबत  बळीराजाला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!