Share

मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने ताब्यात घेतलेला इकबाल कासकर कोण आहे ?

Published On: 

मुंबई – मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याचा हात असल्याचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले होते. त्यानंतर एनसीबीने इक्बाल कासकरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

गेल्या वर्षभरापासून एनसीबीचे अधिकारी मुंबईत कारवाई करुन ड्रग्ज प्रकरणी कारवाई करत आहेत. याच कारवाई दरम्यान वेगवेगळे पुरावे आणि धागेदोरे एनसीबी अधिकाऱ्यांच्या हाती लागत गेले आणि आता ड्रग्ज प्रकरणाचा संबंध थेट अंडरवर्ल्ड सोबत असल्याचं एनसीबीच्या लक्षात आलं. त्यानंतर आता एनसीबीने ही कारवाई केली आहे.

मुंबईत गेल्या दोन दिवसांत एनसीबी अधिकाऱ्यांनी मुंबईत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत कोट्यावधी रुपये असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

या प्रकरणाची चौकशी करत असताना एनसीबीला अंडरवर्ल्ड कनेक्शन मिळून आलं. यामुळंच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला एनसीबीनं कस्टडीत घेतलं आहे. इक्बाल कासकर आधीपासूनच ठाण्याच्या जेलमध्ये आहे.

कोण आहे इकबाल कासकर?

इकबाल कासकर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा लहान भाऊ आहे. बिल्डर्स आणि जमीन मालकांना धमकावणे, त्यांच्याकडून खंडणी वसूल करणे असे आरोप त्याच्यावर आहेत. मार्च २००३ पर्यंत इकबाल कासकर दुबईत वास्तव्य करत होता. मार्च २००३ मध्ये इकबाल कासकर भारतात परतला तेव्हा त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली होतीकोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने २००७ मध्ये त्याची सुटका करण्यात आली होती. जून २०१० मध्ये छोटा राजन गँगने इकबाल कासकरला ठार मारण्याचाही कट आखला होता मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. आता एनसीबीच्या या कारवाईमुळे देखील त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!