मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा जोरदार इनकमिंग सुरु झालं आहे. आता काँग्रेसने स्वबळाची नारा दिला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने देखील येत्या निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केल्याचं दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येत्या निवडणुकांसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात विशेष बळ असलेल्या राष्ट्रवादीने उर्वरित महाराष्ट्राकडे देखील आपला मोर्चा वळवला आहे. आता बुलडाण्यातील नेते प्रसेनजीत पाटील गेले काही वर्षे काँग्रेसमध्ये काम करत होते. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे बुलढाण्यासह विदर्भात राष्ट्रवादीला मोठं बळ मिळणार आहे.
प्रसेनजीत पाटील हे कापूस पणन महासंघाचे संचालक तथा जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यांच्यासोबत आज मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमाला अजित पवार, कायांत पाटील यांच्यसह बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, वरिष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी आमदार उदयसिंग पाडवी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.
आज @NCPspeaks प्रदेशाध्यक्ष ना. @Jayant_R_Patil व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. @AjitPawarSpeaks यांच्या प्रमुख उपस्थितीत कापूस पणन महासंघाचे संचालक तथा जळगाव जामोद कृ. उ. बा. समितीचे सभापती प्रसेनजीत पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. pic.twitter.com/EGhElt47oz
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) June 23, 2021
स्वगृही परतलेल्या प्रसेनजीत पाटील यांच्या येण्याने बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजून एक जागा भक्कम झाल्याचा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. प्रसेनजीत पाटील यांच्यामागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहनही यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या
- मुंबईतील ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने ताब्यात घेतलेला इकबाल कासकर कोण आहे
- ‘कृषी जैवतंत्रज्ञान काॅलेजला विलासराव देशमुखांचे नाव द्या’, आ.सतीश चव्हाणांची ठाकरे सरकारकडे मागणी
- ‘विधानसभा अध्यक्षांची निवडणूक टाळून संवैधानिक व्यवस्था कोलमडली, राष्ट्रपतींना अहवाल पाठवा’
- अजब ! तुकाराम मुंढेंनी ठोठावलेला दंड पुणे महापालिका करणार परत
- परभणीत परिचारिकांचे काम बंद आंदोलन; रुग्णांची गैरसोय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

