टीम महाराष्ट्र देशा : अमरावतीच्या नवनिर्वाचित खासदार नवनीत कौर राणा या सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तसेच खासदार नवनीत राणा त्यांच्या कामासाठी नेहमीच चर्चेत राहतात. आता त्यांचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात त्या डासांना मारणाऱ्या धूराचा पंप घेऊन स्वतः रस्त्यावर फिरत होत्या. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पती आमदार रवी राणादेखील उपस्थित होते.
दरम्यान, खासदार असून सुद्धा काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी शेतात जाऊन पेरणी केली होती. त्यामुळे त्यांच्या या साधेपणाचे सगळीकडे कौतुक झाले होते. तसेच काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी दिलदारपणा दाखवत आपल्या खासदारकीचा पहिला पगार दुष्काळग्रस्तांसाठी दिला होता.
महत्वाच्या बातम्या
नवनीत राणा यांचा दिलदारपणा; पहिला पगार दिला दुष्काळग्रस्तांसाठी
नवनीत कौर राणा संसदेतून थेट शेतात ; सोयाबीनची केली पेरणी
शिवेंद्रराजेचं काय राणा जगजितसिंह देखील भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत : अजित पवार
‘शिवसेना माझी आई आहे तर मातोश्री हे मंदिर’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

