Share

ठाकरे सरकारने ‘जलयुक्त शिवार’ बंद केल्यामुळेच महापूर; फडणवीसांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. गावे जलमय झाली आहे. नद्यांनी पात्रं सोडली आहेत. धरणं भरली आहेत. नाले ओसंडून वाहत आहेत. मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे. आता मराठवाड्यातील महापुरावरुन आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महापुराची कारणं शोधताना पर्यावरण अभ्यासक आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारकडे बोट दाखवले होते.

जलयुक्त शिवाराच्या कामात मोठ्या प्रमाणात नद्यांशी छेडछाड केल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप पर्यावरणतज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला आहे. जलयुक्त शिवार यांच्या कामाची चौकशीची मागणी पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केली होती. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली होती.

मात्र, आता फडणवीस यांनी ठाकरे सरकारने ही महत्त्वकांक्षी योजना बंद केल्यामुळेच पूरपरिस्थिती उद्भवून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा आरोप केला आहे. ‘भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली होती. त्यामुळे नद्यांचे खोलीकरण करण्यात आले होते. पण, आज योजना बंद केल्यामुळे नद्यांचा महापूर आला’, असा आरोप फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाले. करजखेडा गावात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कर्जखेडा गावातील पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, आम्ही लोकांशी चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तेव्हा आमच्या काळात आम्ही जलयुक्त शिवार योजना राबवली होती. या योजनेतून नदीचे खोलीकरण करण्यात आले होते. ज्यांनी केले त्यामुळे काही जणांच्या शेती वाचली आहे. ही योजना मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. पण, या सरकारने जलयुक्त शिवार योजना बंद केली. त्यामुळे खोलीकरण आणि रुंदीकरण बंद झाले, त्यामुळे या ठिकाणी पाणी साचत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!