🕒 1 min read
औरंंगाबाद : परराज्यातून आलेल्या आणि आश्रमात झोपलेल्या साधुंना मारहाण करणाऱ्या टोळीच्या प्रमुखास तब्बल पाच महिन्यानंतर पोलिसांनी गजाआड केले. करणसिंग उर्फ कन्हैया उर्फ कन्नू महादु सोळंकी (रा.सावंगी खडी क्रेशरजवळ, जि.औरंगाबाद) असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या टोळी प्रमुखाचे नाव असल्याची माहिती स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे यांनी मंगळवारी (दि.२७) दिली.
प्रिया शरणजित महाराज उर्फ यादवचंद्र राधाकृष्ण पाराशर (वय ६१, रा.फत्तेपुर, शेखावरी, जि.शिखर, राजस्थान, ह.मु.राणा गोंविद सेवामिशन, साताळा शिवार) हे ११ नोव्हेंबर २०२० रोजी आपल्या सहकाऱ्यांसह आश्रमात झोपले होते. मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास आश्रमात दरोडा घालण्याच्या उद्देशाने शिरलेल्या सात ते आठ जणांनी आश्रमातील साधुंना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली होती.
याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आश्रमात झोपलेल्या साधुंना मारहाण करणारा करणसिंग उर्फ कन्हैया उर्फ कन्नू महादु सोळंकी हा जालना जिल्ह्यातील हसनाबाद येथे आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हेशाखेला मिळाली होती.
ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक गणेश राऊत, पोलिस अंमलदार नामदेव शिरसाट, बाबासाहेब नवले, ज्ञानेश्वर मेटे आदींच्या पथकाने सापळा रचून हसनाबाद येथून करणसिंग उर्फ कन्हैया उर्फ कन्नू महादु सोळंकी याला गजाआड केले.
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींसह सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह जाहिरात; काँग्रेसचं कंपनीविरोधात खळ्ळ-खट्याक !
- आधी रक्तदान करा आणि त्यानंतरच कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्या – विजय वडेट्टीवार
- बीड जिल्हाबंदी; नाकाबंदीवर पोलिसांसोबत शिक्षक देखील तैनात
- राज्यभर आरोग्य सुविधांचा बोजवारा, आरोग्यमंत्री फक्त तोंडपाटीलकीत बिझी
- प्रवासी संख्या कमी असल्याने काही रेल्वे केल्या रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
