Share

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक, आरोग्यासाठी २३ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

Published On: 

नवी दिल्ली : मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोदी सरकारने पहिल्याच बैठकीमध्ये आरोग्यासाठी २३ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी नवे चेहरे समोर आले. या आधी मोदी सरकारच्या निर्णयांची माहिती देण्यासाठी रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर समोर येत होते. आता ही जबबादारी माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्याने आरोग्य मंत्रालय सोडवे लागणाऱ्या डॉ. हर्षवर्धन यांच्या ऐवजी नवीन आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मोदी मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांसोबत ही पहिलीच बैठक होती. व्हच्युअली झालेल्या या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये सर्व ३० कॅबिनेट मंत्री सहभागी झाले होते.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार आतापासूनच तयार असल्याचे आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले. त्यासाठी सरकारने आधी १५ हजार कोटींचे पहिले पॅकेज दिले होते. त्या माध्यमातून कोव्हीड हॉस्पिटलची संख्या १६३ वरुन ४,३८९ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. आधी कोव्हीड हेल्थ सेंटर नव्हते आता ८,३३८ हेल्थ सेंटर तयार असल्याचे ते म्हणाले. सध्या चार लाख ऑक्सिजन बेडची संख्या झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आलेल्या अडचणी लक्षात घेवूनच नवीन २३ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. यातील १५ हजार कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करणा आहे तर ८ हजार कोटी रुपये राज्यांना दिले जाणार आहेत. लहान मुलांना होणारा धोका लक्षात घेता त्या दृष्टीने तयारी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!