औरंगाबाद : उद्योजकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडुन खंडणी उकळणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पंधरा लाखाची खंडणी घेताना रंगे हात पकडले आहे. ही कारवाई बुधवारी रात्री अकराच्या सुमारास सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली जलदी मिर फकर अली मिर जाफर अली असे खंडणीखोराचे नाव आहे.
टाऊन हॉल परिसरात राहणारे बॉम्बे क्लास चे मालक शेख साबीर मोहम्मद शरीफ यांना गेल्या दोन वर्षापासून जालदी मिर फकर हा माहिती अधिकार टाकून त्यांच्या मालमत्तेची व तसेच त्यांनी बांधकाम केलेल्या इमारतींची माहिती मागत होता. त्यासाठी तो वारंवार त्यांना त्रास देत होता.
माहिती अधिकार अर्ज टाकू नये म्हणून तो शेख साबीर यांच्याकडे पंचवीस लाखांची खंडणी मागत होता तडजोडी अंती १५ लाख रुपये घेताना त्याला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. रात्री उशिरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सिटी चौक पोलिस या प्रकरणी पुढील तपास करीत आहे.
महत्वाच्या बातम्या
- केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज – नाना पटोले
- ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा राणेंनी काय प्रतिक्रिया दिली होती ते आठवावं’
- राणेंची मंत्रिपदी वर्णी लागल्याने शिवसेना-भाजपच्या युतीची शक्यता अधिक धूसर ? फडणवीस म्हणाले…
- काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा, हिजबुलचा टॉप कमांडर ठार
- विरोधकांवर भारी ठरला दानवेंचा ‘चकवा’, रेल्वे राज्यमंत्री पदी मिळवली बढती!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

