मुंबई : बॉलीवुडचे पहिले सुपरस्टार आणि ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले दिलीप कुमार यांचे निधन झाले. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलीवुडमधून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांचे मोठे भाऊ वीर चोप्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
वीर चोप्रा हे मालदीवमध्ये सुटी घालवायला गेले होते. यादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तीन आठवड्यापर्यत त्यांची कोरोनाशी झुंज सुरु होती. बुधवारी 7 जुलै रोजी अखेर त्यांची झुंज कायमची संपली. विधु विनोद चोप्रा यांच्या अनेक चित्रपटात वीर चोप्रा यांनी क्रिएटीव्ह प्रोड्युसर म्हणून काम केलेले आहे. बॉबी देओल आणि शबाना रजा अभीनीत ‘करीब’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता.
याव्यतिरिक्त विधु विनोद चोप्रा यांच्या मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, 3 इडियट्स या चित्रपटातही त्यांनी क्रिएटीव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले आहे. काही वर्षापुर्वी आलेला ब्रोकन हॉर्सेस हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. हा चित्रपट 2015 साली प्रदर्शीत झाला होता. त्यांच्या पत्नी नमीता चोप्रा यांनी साऊंड डिझायनर म्हणून काम केले होते.
महत्वाच्या बातम्या
- उद्योजकाला ब्लॅकमेलकरून १५ लाखांची खंडणी मागणारा गजाआड
- केंद्रातील फक्त मंत्री नव्हे तर पंतप्रधानच बदलण्याची गरज – नाना पटोले
- ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हा राणेंनी काय प्रतिक्रिया दिली होती ते आठवावं’
- राणेंची मंत्रिपदी वर्णी लागल्याने शिवसेना-भाजपच्या युतीची शक्यता अधिक धूसर ? फडणवीस म्हणाले…
- काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवाद्यांचा खात्मा, हिजबुलचा टॉप कमांडर ठार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

