🕒 1 min read
मुंबई: १०० कोटी वसुली आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अखेर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाकडून अटक करण्यात आले आहे. १३ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली असून या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फटाके फुटायला लागले,अनिल देशमुख यांना मध्यरात्री १.०६ वाजता अटक असे खोचक ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे. दिवाळीपूर्वीच राज्यात फटके फुटू लागले आहेत. अशी प्रतिक्रिया अतुल भातखळकर यांनी दिली आहे.
https://twitter.com/BhatkhalkarA/status/1455376841993166856
दरम्यान आता यावर भाजप आमदार राम कदम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुलीमध्ये त्यांचे प्रमुख बॉस कोण आहेत? वसुलीचे हिस्सेदार, वाटेकरी, कोण कोण नेते आणि पक्ष आहेत, हे समोर येईल. अन अर्थातच त्या बड्या नेत्यांनाही जेलमध्ये जावे लागेलच. ही लढाई कोणा एका व्यक्ति विशेषच्या विरोधातील नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. कल्पना करा. महिन्याला एका खात्यात फक्त मुंबईतून १०० कोटी तर संपूर्ण महाराष्ट्रात किती? अन सर्व खाती मोजली तर किती कोटी? हे सरकार आहे की नोटा छापण्याचा कारखाना?’ असे ट्वीट राम कदम यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- IPL 2022: धोनीचा मोठा खुलासा म्हणाला..
- संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी मोठ्या संख्येने नागरिकांना काँग्रेसचे सदस्य करून घ्या- एच. के. पाटील
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
- इंग्लंडचा श्रीलंकेवर दणदणीत विजय
- ‘फिडे’ ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत हरिकाची पोगोनिनाविरुद्ध आघाडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

