🕒 1 min read
नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात होत असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद जगभर उमटत असून यावर जगभरातून शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला जात आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते, कलाकार आणि राजकारण्यांचा देखील समावेश आहे.
इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट शेतकरी आंदोलनाचा व्हिडीओ ट्विट करत याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. आपण शेतकरी आंदोलनाविषयी बोलत का नाहीत?, असा सवाल तिने ट्विटद्वारे केला आहे. त्यानंतर तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली आहे. ग्रेटानं ट्विट करत भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहोत,” असं म्हटलं आहे.
दरम्यान, आता पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्या नंतर मिया खलिफा हिनं देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. मियानं एक फोटो शेअर करत मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे असं म्हटलं आहे.
मिया खलिफानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं असून त्यात म्हटलं आहे की, मानवाधिकाराचं इथं उल्लंघन होत आहे. नवी दिल्लीच्या आसपासच्या परिसरात इंटरनेट बंद केलं आहे. दुसऱ्या ट्वीटमध्ये तिनं काही कलाकारांना टार्गेट करत म्हटलं आहे की, पेड अॅक्टर्स… मला खात्री आहे की, पुरस्कारांच्या मोसमात यांच्या नावाला डावललं जाणार नाही. मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे, असं तिनं म्हटलं आहे.
What in the human rights violations is going on?! They cut the internet around New Delhi?! #FarmersProtest pic.twitter.com/a5ml1P2ikU
— Mia K. (@miakhalifa) February 3, 2021
“Paid actors,” huh? Quite the casting director, I hope they’re not overlooked during awards season. I stand with the farmers. #FarmersProtest pic.twitter.com/moONj03tN0
— Mia K. (@miakhalifa) February 3, 2021
महत्वाच्या बातम्या
- नेवासे तालुक्यातील रस्त्यांना ‘शंभर कोटी’चा निधी, नेवासा -शेवगाव रस्त्याची साडेसाती सुटणार
- कैद्यांचे बनावट जामीनपत्र कारागृहाच्या पेटीत
- आगामी कसोटी सामन्यातील भारताच्या कामगिरीवर इंग्लंडच्या दिग्गजाचे भाष्य !
- मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू होणार
- शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे हे शिवसेनेचे ढोंग; संजय निरूपमांचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
