पुणे : या वर्षाच्या मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देशात थैमान घातले होते. एप्रिल महिन्यात पुण्यातील स्थिती ही गंभीर बनली होती. दिवसाला सुमारे ७ ते ८ हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद एकट्या पुणे शहरात केली गेली. यानंतर मे महिन्याच्या अखेरीस दुसरी लाट ओसरू लागली. सध्या दररोज सरासरी २०० ते ४०० कोरोना रुग्णांची नोंद पुणे शहरात केली जात आहे.
पुणे शहरात आज नव्याने १८५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ८८ हजार ४७८ इतकी झाली आहे. तर, शहरातील २३७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ७७ हजार २८५ झाली आहे.
दरम्यान, पुणे शहरात आज एकाच दिवसात ९ हजार ७६६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २९ लाख २७ हजार १०६ इतकी झाली आहे. सध्या पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २ हजार ३९१ रुग्णांपैकी २०६ रुग्ण गंभीर तर ३६० रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तसेच, नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ८०२ इतकी झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- संजय राऊतांनी एकदा निवडणूक लढवून दाखवावीच; मनसेचं खुलं आव्हान !
- सीरम इनस्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला पोहचले गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला
- ‘आता मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करा’, खा.गौतमची ‘गंभीर’ मागणी
- राज ठाकरेंचे पुण्याकडे खास लक्ष; चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर ठाकरे पुन्हा पुणे दौऱ्यावर
- मनसेसोबत युती करण्याआड ‘तो’ एक मुद्दा येतोय – देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

