Share

…अखेर अक्षय कुमारच्या ‘सुर्यवंशी’ची रीलीज डेट जाहीर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत ‘सुर्यवंशी’ या चित्रपटाची रिलीज डेट आखेर जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट ३० एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. सुर्यवंशी मागील वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते.

कोरोना काळात रखडलेल्या अनेक चित्रपटांचे शुटिंग पुन्हा सुरु झाले आहेत. तसेच प्रदर्शन रखडलेल्या चित्रपट प्रदर्शित होत आहेत. शनिवारी सलमान खानने ‘राधे’ची प्रदर्शनाची तारीख जाहीर करताच अक्षयच्या फॅन्सला उत्सुकता लागली होती की ‘सुर्यवंशी’ची तारीख कधी जाहीर होत आहे. रविवारी सकाळी टिवट करुन चाहत्यांना खुश केले. रविवारी सुर्यवंशी चित्रपटाचा दिग्दर्शक रोहीत शेट्टीचा वाढदिवसही आहे.

https://twitter.com/akshaykumar/status/1370952829221826562

रोहित शेट्टीच्या सुर्यवंशी चित्रपटाद्वारे हॉलीवूडच्या धर्तीवर बॉलीवूड मध्येही सिनेमॅटीक कॉप युनिव्हर्स सुरु केले आहे. या चित्रपटात रोहित शेट्टीच्या दुसऱ्या चित्रपटातील ‘सिंघम’ आणि ‘सिंबा’ हे पोलिस पात्र एकत्र येणार आहे. सुर्यवंशी या चित्रपटात मुख्य भूमिकेत अक्षय कुमार, कटरीना कैफ, अजय देवगन, रणवीर सिंह, जॅकी श्रॉफ आणि गुलशन गोव्हर हे कलाकार आहे. या चित्रपटाद्वारे अक्षय-कटरीना ही सुपरहिट जोडी पुन्हा एकत्र येत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!