औरंगाबाद : एसीपी वानखेडेंनी कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी दिले २१ हजार रूपये
हेल्मेट सक्तीबाबत दिलेली तारीख बदलल्याबद्दल वाहतूक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सुरेश वानखेडे यांचा माफीनामा औरंगाबाद खंडपीठाने अखेर स्वीकारला. तसेच सहाय्यक आयुक्त वानखेडे यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी स्वेच्छेने २१ हजार रुपये दिले असून त्यास खंडपीठाने मान्यता दिली.
कोवीड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक वैद्यकीय सोयीसुविधाबाबतच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल सुमोटो याचिकेवर सुनावणीदरम्यान, हेल्मेट घालणे , मास्क लावणे तसेच आधार कार्ड सोबत ठेवण्याबाबतच्या आदेशाची योग्य अंमलबजावणी होत नसल्याचे नमूद करून यासंदर्भात किती गुन्हे दाखल केले याचीही माहिती खंडपीठाने मागविली होती.
या बाबत आधी हेल्मेट सक्ती ५ मे पासून लागू होईल असे जाहीर करून नंतर ती १६ मे पासून लागू होईल अशी ताहिती प्रसिद्ध झाली होती. मागील सुनावणीत खंडपीठाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) यांना लेखी माफीनामा सादर करण्याचे आदेश दिले होते.
महत्वाच्या बातम्या
- शहरासाठी २१८ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी उपाय योजना करा, खंडपीठाचे निर्देश
- कोरोना नंतर म्युकरमायकोसीस आजार; प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवण्याचा दृष्टीकोन हवा- आ. निलंगेकर
- मान्सूनपूर्व कामे जलदगतीने पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!
- चक्रीवादळाचे रौद्ररूप : केरळातील अनेक घरे जमीनदोस्त, कोकणात समुद्र खवळला
- ‘म्युकरमायकोसिस’चा लातुरात शिरकाव; ५ रुग्ण आढळले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

