मुंबई : 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीचा वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली.चौफेर टीका झाल्याने तसेच महाविकास आघाडीच्या अडचणी देखील वाढू लागल्याने रविवारी या प्रकरणात संजय राठोड यांना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
दरम्यान, एका बाजूला राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत असले तरीही वास्तविक चित्र काही वेगळेच असल्याची चर्चा सुरु झाली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर आली होती. यानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. ‘राजीनामा फ्रेम करून ठेवण्यासाठी नव्हता असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र तरीही त्यांनी हा राजीनामा राज्यपालांकडे का पाठवला नाही ?’ असा सवाल भाजप नेत्यांनी केला होता.
अखेर राजीनामा देऊन आज चार दिवस झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनाम्यावर सही केल्याचं समजत आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या मंत्रिपदावरून हकालपट्टीवर शिक्कामोर्तब झाला आहे. तर, लवकरच हा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवला जाईल, अशी माहिती देखील सूत्रांद्वारे समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांची तौबा गर्दी; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
- चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने ; बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
- ममतादीदी बंगालच्या वाघीण; पश्चिम बंगाल निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेचा मोठा निर्णय !
- अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली लस; सर्व ज्येष्ठांनी लस घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
