🕒 1 min read
चेन्नई : आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठीचा खेळाडूंचा लिलाव गुरुवारी (१८ फेब्रुवारी) चेन्नई येथे संपन्न झाला. या लिलावामध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा लिलाव झाला तर काही खेळाडू ‘अनसोल्ड’ म्हणजेच विकले गेले नाहीत. खेळाडूंच्या लिलावानंतर सर्व संघांनी आगामी हंगामाची तयारी सुरू केली. त्यातच आता आयपीएलच्या तयारीसाठी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनी चेन्नईमध्ये पोहचला आहे.
चेन्नई सुपर किंग्सचाकॅम्प चेन्नईत ९ मार्चपासून सुरू होणार असल्याचे CSKच्या CEOनी सांगितली. पण, तत्पूर्वी महेंद्रसिंग धोनी ( Mahi) यानं राजस्थानातील साचोर जिल्ह्यात भेट दिली आणि तेथे त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांनी कोरोना नियमांना पायदळी तुडवले.
https://www.instagram.com/p/CL9JapZrLnt/?utm_source=ig_web_copy_link
येथील शाळेचं उद्धाटन करण्यासाठी धोनी आला होता. त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली आणि आयोजनकांना बॅरीगेड्स लावावे लागले. गर्दी नियंत्रणाबाहेर होत असल्याचे दिसताच धोनीला गाडीत बसवून अहमदाबाद येथे पाठवण्यात आले. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
महत्वाच्या बातम्या
- कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी‘एसओपी’ लागू, अजित पवारांची घोषणा
- चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने ; बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
- पोलार्डचा धमाका एकाच षटकात लगावले ६ उत्तुंग षटकार; धनंजय ची हॅटट्रीक
- अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली लस; सर्व ज्येष्ठांनी लस घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
