🕒 1 min read
मुंबई : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. भाजपने ममतादीदींचं वर्चस्व संपवण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी बलाढ्य फौज उतरवली आहे.
सद्या, पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसचे (TMC) सरकार आहे. आता, बंगालच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. दरम्यान, बिहार निवडणुकांनंतर शिवसेना पश्चिम बंगालमध्ये देखील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. इतकच नाही तर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बंगालच्या दौऱ्यावर जाणार असल्याचं देखील बोललं जात होतं.
मात्र आता, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी बंगालच्या निवडणुकांबाबतची पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांना शिवसेनेचा पाठींबा असल्याचं सांगत शिवसेना निवडणूक लढवणार नसल्याची माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट करून भाष्य केलं आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 4, 2021
‘शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, याविषयी अनेक जणांच्या मनात उत्सुकता आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थिती पाहता ही निवडणूक ‘दीदी विरुद्ध सगळे’ अशी होणार आहे. सर्व एम – मनी (पैसा), मसल्स (शक्ती) आणि मीडिया ‘म’मतादीदींच्या विरोधात वापरले जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका न लढवता त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ममता दीदींना गर्जना करणारे यश मिळो. आमच्या मते त्याच खऱ्या बंगाली वाघीण आहेत,’ असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठी चाहत्यांची तौबा गर्दी; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज
- चौथ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने ; बुमराहच्या जागी ‘या’ खेळाडूला संधी
- पोलार्डचा धमाका एकाच षटकात लगावले ६ उत्तुंग षटकार; धनंजय ची हॅटट्रीक
- अग्गबाई, वर एक आणि वधू दोन! बुमराहची खरी वधूराणी कोण? दोघींचे नाव चर्चेत
- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतली लस; सर्व ज्येष्ठांनी लस घेण्याचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
