बीड : न्यायालयीन कोठडीत असलेल्या करुणा शर्मा यांना अखेर आज दिलासा मिळाला आहे. त्यांनी अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, काही कारणास्तव सुनावणी झाली नव्हती. आज मंगळवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने त्यांना २५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
अंबाजोगाई आणि परळीमध्ये चार्जशीट दाखल होईपर्यंत न येण्याच्या त्यांना सूचना करण्यात आल्यात. एट्रॉसिटी प्रकरणात करुणा शर्मा यांना ५ सप्टेंबरला अटक झाली होती. जवळपास १६ दिवसांनी त्यांची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. शर्मांसह त्यांचे चालक अजय मोरेंनाही जामीन मिळाला आहे.
परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात करूणा शर्मा या न्यायालयीन कोठडीत होत्या. त्यांनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. न्या. सुप्रिया सापतनेकर यांच्या न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अशोक कुलकर्णी तर करुणा शर्मा यांच्या वतीने वकील भारजकर यांनी बाजू मांडली.
करुणा शर्मा यांनी पुन्हा बीड जिल्ह्यात येऊन अशा प्रकारचा कृत्य करू नये अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टासमोर ठेवली होती तर करुणा शर्मा यांना जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात आल्याचा युक्तिवाद वकील भारजकर यांनी केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने यावर मंगळवारपर्यंत निकाल राखून ठेवला होता. आज मंगळवारी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. आता करुणा शर्मा पुढे काय पाऊच उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नेमकी घटना काय?
करुणा शर्मांनी आपण धनंजय मुंडे यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा करुन खळबळ उडवून दिली होती. त्यासाठी त्या परळी येथे दि. ५ सप्टेंबर रोजी आल्या होत्या. परळीमध्ये करुणा शर्मा दाखल झाल्यानंतर वैद्यनाथ मंदिरासमोर पायरीचे दर्शन घेण्यासाठी जात असताना जमावाने त्यांना अडवलं. तसेच घेराव घालण्याचा प्रयत्न केला. वैजनाथाच्या दर्शनासाठी करुणा मुंडे पोहोचल्या. पण या ठिकाणी आमच्या साहेबाला बदनाम करायला आलात का? असा सवाल करत परळीच्या महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, करुणा यांना गाडीत पिस्तुल सापडल्यामुळे अटक करण्यात आली. धनंजय मुंडे यांनी जबरदस्ती आणि बळाचा वापर करून माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केलेत. मला फसवायचा प्रयत्न करत आहेत. माझ्या गाडीत जबरदस्तीने रिव्हॉल्व्हर ठेवली, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला. त्यानंतर त्यांना अटक केल्यानंतर जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर शर्मा यांनी जामिनासाठी कोर्टात याचिका दाखल केली. ज्यावर सुनावणी होऊन आज मंगळवारी २५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. आता करुणा शर्मा पुढे काय पाऊच उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गीतेंच्या वक्तव्याचा सरकारशी काही संबंध नाही’, संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- ‘शिवसैनिकांची नार्को टेस्ट करा, आघाडी नको असाच आवाज येईल’; सुधीर मुनगंटीवार यांची टीका
- ‘राज्यात आघाडी सरकार असले तरीही आम्ही आघाडी सैनिक नाही आहोत,आम्ही शिवसैनिकच आहोत’
- राष्ट्रवादीचा जन्मच कॉंग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालाय-अनंत गीते
- चंद्रकांत पाटील यांनी स्वत: खाल्ले पण दिसू दिले नाही; नाना पटोले यांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

