Share

नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- चंद्रकांत पाटील

Published On: 

मुंबई : राज्यात सत्ताधारी आणि भाजपमध्ये टीका-टिपण्णींचं सत्र सुरु आहे. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नवाब मलिक यांना आम्ही कोणत्याही गावात फिरू देणार नाही. त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे. इतकेच नाही, तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हाच दाखल केला पाहिजे, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यानंतर पाटलांनी मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘नवाब मलिक यांच्याबाबतीत आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. त्यांचे ‘आ बैल मुझे मार’, असे असते. आ बैल मुझे मार हे त्यांनी स्वत:हूनच मान्य केलेले आहे. ज्यांना दोन दिवसांनी टाडाखाली अटक झाल्यानंतर जप्त होणारी जमीन त्यांनी अंडरस्टँडिगने दोन दिवस आधी स्वस्त घेतली गेली’, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

मलिकांची कमी पैशात खरेदी केलेली जमीन जप्त होणार होती, ती जमीन यांनी स्वस्तामध्ये घेतली हे त्यांनी मान्य केले आहे. म्हणून एनआयएमार्फत यांची चौकशी व्हायला पाहिजे, अशा मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांना एनआयएने ताबडतोब चौकशीसाठी बोलवावे आणि हा देशद्रोह असल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. मुंबईतील बॉम्बस्फोटाशी संबंधित लोकांशी यांचे संबंध आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!