🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरुन कंगनावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठत आहे. त्यातच स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कंगनाने केलेल्या वक्तव्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वतंत्र नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कंगना राणावत या बाईची स्वातंत्र्यासारख्या मोठ्या विषयावर बोलण्याची औकात आहे का? हे आधी तिने तपासून पहावं, असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले आहेत. ते बुलडाण्यातील चिखली येथे आले असताना बोलत होते.
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की भगतसिंग यांच्यापासून ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यापर्यंत स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांनी हुतात्मे पत्करले, त्याचबरोबर स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर महात्मा गांधींनी देखील देश एक केला होता, आणि कंगना राणावत सारख्या एखाद्या नटीने अशा पद्धतीचे वक्तव्य करणं म्हणजे हा स्वातंत्र्याचा नाही तर संपूर्ण देशाचा अपमान आहे, असेही शेट्टी यांनी म्हणाले आहेत.
लकड़ी के घोड़े पर प्लास्टिक की तलवार लेकर वीरांगना बनने वाली सरकारी चाटुकार आजादी के सिपाहियों का अपमान कर रही है। हज़ारों कुर्बानियों के नतीजे को भीख बता रही है। pic.twitter.com/gH4JbOd4l9
— Rofl Gandhi 2.0 ???? (@RoflGandhi_) November 10, 2021
दरम्यान, कंगनाने सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी बोलायचं झालं तर त्यांना हे माहित होतं की, रक्तपात झाला तरी हिंदुस्तानी हा हिंदुस्तानींवर वार करणार नाही. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत मोजली हे खरं. पण ते स्वातंत्र्य नव्हतं, भीख होती. खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं असं म्हणाली. कंगनाच्या उत्तरावर निवेदिका नाविका कुमार म्हणाल्या, म्हणूनच सगळे तुला म्हणतात की तू भगवा आहेस. त्यावर कंगना म्हणते,आता या विधानानंतर माझ्यावर आणखी 10 केसेस होणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गेले दीड वर्ष मंत्रालयात पाऊल न ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनाही वेतन आणि भत्ते मिळता कामा नये’
- …हा सगळा ड्रग्ज रॅकेटचा खेळ गुजरातमधून चालतोय का?- नवाब मलिक
- जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही- गोपीचंद पडळकर
- काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांनी घेतली आमदारकीची शपथ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

