Share

‘नगर रुग्णालयातील हत्याकांड प्रकरणी राजेश टोपेंवर गुन्हा दाखल करा’, भातखळकरांचे सीएम ठाकरेंना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत झालेल्या ११ रुग्णांच्या मृत्यूस केवळ महाभकास आघाडी सरकार जबाबदार आहे ही दुर्घटना नसून आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेमुळे घडलेले हत्याकांड असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेच्या वेळी नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर करून दहा महिने उलटून गेले. तरीही महाविकास आघाडी सरकारने त्यातील एकाही सूचनेची अंमलबजावणी केली नाही. त्याचमुळे अहमदनगर येथील हत्याकांड घडल्याचेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

९ जानेवारी रोजी भंडारा येथील शासकीय रुग्णालयात आगीची घटना घडल्यानंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने जानेवारीमध्येच सरकारला अहवाल सादर करून राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय रुग्णालयांमध्ये तात्काळ सुधारणा करण्यासाठी अत्यंत महत्वाच्या १५ सूचना केल्या होत्या. परंतु त्यातील एकाही सूचनेची ठाकरे सरकारने अंमलबजावणी केलेली नाही. केवळ वसुली व टक्केवारी मध्ये मग्न असलेल्या सरकारने एकाही शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडीट केले नाही, कोणत्याही शासकीय रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणा बसविण्यासाठी व सुधारण्यासाठी निधी दिला नाही.

मागील वर्षभराच्या काळात ७ रुग्णालयांमध्ये आग लागून ७८ रुग्णांचा बळी गेला, घटनेनंतर ‘आम्ही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे’, ‘चौकशी करून दोषींवर कारवाई करू’ अशी मोघम व वेळकाढू वक्तव्ये करायची, परंतु प्रत्यक्ष कृती करताना हाताला लकवा मारल्याप्रमाणे थंड राहायचे असा एककलमी कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारने चालविला आहे. मुख्यमंत्री महोदय, आणखी किती निष्पाप रुग्णांचा बळी घेतल्यावर आपल्या सरकारला व मंत्र्यांना जाग येणार आहे?,’ असा प्रश्न देखील भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!