तुळजापूर –कोरोनाच्या महामारीमूळे महाराष्ट्रात २२ मार्च ते ८ जून २०२० दरम्यान अतिकठोर टाळेबंदी होती,या काळात महावितरण कडून ना वीज मीटर रिडींग साठी प्रतिनिधी पाठविण्यात आले ना वीज देयके वितरीत करण्यात आली. घरातच बंदिस्त झालेल्या जनतेला या कालवधीतल्या वीज वापरासाठी महावितरण कंपनीकडून अचानक वापरपेक्षा तिप्पट-चौपट रक्कमेची अवाजवी व भरमसाठ वीज बिल पाठवली गेली या वीज बिलाचे आकडे इतके मोठे होते की ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेसह शहरातील मध्यमवर्गीय यांना ही भोवळ आली.
कोरोनाच्या टाळेबंदीत व्यापार,उद्योग, बंद होऊन असंख्य लोक बेरोजगार झालेले आहेत,आणि अनेकांच्या पगारात २५ ते ५० टक्के कपात झाल्यामुळे उत्पनाचे स्रोत बंद झाले असताना विजबिलाची भरमसाठ रक्कम भरण बहुसंख्य नागरिकांना शक्यच नव्हते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतरही राजकीय पक्षांनी नागरकांमधील संतापाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ऊर्जामंत्री नितिन राऊत यांच्याकडे तक्रारी मांडल्या,त्यानंतर ऊर्जामंत्री यांनी वीजबिलाबाबत कपात करण्याचा व दिलासा देण्याचा निर्णय लवकरच घेऊ असे आश्वासन दिले.
वीजबिलासंदर्भात दिलासा देण्याचं खोट आश्वासन देऊन सर्वसामान्य नागरिकांना महिनोमहिने झुलवत ठेवण आणि शेवटी सर्व सामान्य नागरिकांकडून वीज पुरवठा खंडित करण्याच्या धमक्या देऊन बेहिशेबी वीजबिल रक्कम वसूल करने ही केवळ राजकीय आश्वासनाची फसवणुक नाही,तर वीज कंपन्याशी संगनमत करून करण्यात आलेली जनतेची लूट आहे, यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता भयभीत झाली असून,प्रचंड मानसिक आघात व क्लेश पोहोचला आहे,याची सर्वस्वी जबाबदारी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत व महावितरण कंपनीचे प्रमुख अधिकारी यांच्या विरोधात फसवणूक व मानसिक आघात पोहचविण्याचा गुन्हा दाखल करावा,अशी मागणी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा सचिव ज्योतीबा येडगे, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, जनहित व विधी विभागाचे ऍड.मतीन बाडेवाले,शहराध्यक्ष अलिम शेख, शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, शहर उपाध्यक्ष रमेश घोडके,मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या स्वाक्षरी आहेत,यावेळी निखिल येडगे,आवेज इनामदार, संदीप वैद्य,सुनिल कांबळे आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
- जनतेशी मनमोकळा संवाद साधताना धनंजय मुंडे झाले भावूक
- आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता राखावी : दिल्ली पोलीस
- ‘विजय वडेट्टीवार यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्यास जशास तसे उत्तर दिले जाईल’
- आघाडी सरकारचा आडमुठेपणा; शेतकऱ्यासाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनाला परवानगी नाकारली
- ‘प्रबोधनकारां’चा पुरोगामित्वाचा विचार आजही महाराष्ट्राला आवश्यक – अजित पवार


