Share

नायगावमध्ये दोन गटांत हाणामारी, ३८ जणांना अटक

Published On: 

नांदेड : नायगाव तालुक्यातील कहाळा खु. येथे शुक्रवारी हाणामारीची घटना घडली. या हाणामारीत तब्बल ३८ जणांना अटक करण्यात आली आहे. दोन गटात झालेल्या मारहाणीत दोन्ही गटांच्या तक्रारी वरून संपूर्ण ३८ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटने मागे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला वाद कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

कहाळा खु. येथील प्रभाकर नामदेव मेघाळ व नामदेव हेंडगे आपसात भांडण करीत होते. हे भांडण नामदेव यांचा मुलगा सोडविण्यासाठी मध्ये पडला असता प्रभाकर यांनी त्यास मारहाण केली. ही बाब गावात पसरून दोन्ही गट आमने सामने आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भांडण सोडवली. नसता या ठिकाणी मोठी घटना घडली असती, अशी चर्चा परिसरात रंगत होती.

या घटनेला ग्रामपंचायत निवडणुकीतील वाद कारणीभूत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी प्रथम तक्रार काशीबाई मेघाळ यांनी दिल्यावरून १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले, तर दुसऱ्या गटाच्या तक्रारीवरून १९ जणांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले. सगळ्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सपोनि करीमखा पठाण यांनी दिली. तपास जमादार एन.एम. पोले करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!